IND vs AFG Toss : टीम इंडियाचा अफगाणिस्तान विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, एकूण दोघांचं पदार्पण, कुणाला संधी?
India vs Afghanistan Only Test Toss and Playing 11 : टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यासाठी क्रिकेट चाहते सज्ज झाले आहेत. सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सामन्यातील पहिला चेंडू टाकण्यात येणार आहे.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमानंतर क्रिकेट चाहत्यांना अफगाणिस्तानच्या भारत दौऱ्याचे वेध लागले होते. अखेर अफगाणिस्तानच्या भारत दौऱ्याला आज 6 जूनपासून सुरुवात होत आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 9 वाजता न्यू चंडीगड येथील मुल्लानपूरमधील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये टॉस झाला. टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. शुबमन गिल याचा हा कसोटी कर्णधार म्हणून नववा सामना आहे. शुबमनची या 9 कसोटी सामन्यांपैकी टॉस जिंकण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. कर्णधार शुबमन गिल याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोघांचं कसोटी पदार्पण, कुणाला संधी?
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यातून एकूण दोघांचं पदार्पण झालं आहे. टीम इंडियाकडून मानव सुथार याचं पदार्पण झालं आहे. तर अफगाणिस्तानकडून नांगेलिया खरोटे याला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. दोन्ही कर्णधारांनी टॉसनंतर याबाबतची माहिती दिली.
15 वर्षांनी पहिल्यांदाच असं घडलं
दरम्यान टीम इंडियाची कसोटी सामन्यासाठी मायदेशात 15 वर्षांत आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोघांशिवाय खेळण्याची पहिलीच वेळ ठरली आहे. याआधी नोव्हेंबर 2010 साली या दोघांशिवाय भारतीय संघ मायदेशात कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर या दोघांपैकी कुणीतरी 1 प्लेइंग ईलेव्हनचा भाग होता. मात्र आता टीम इंडिया दोघांशिवाय खेळत आहे. त्यामुळे ही युवासेना अनुभवी खेळाडूंशिवाय कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
उभयसंघातील दुसराच कसोटी सामना
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील हा दुसराच कसोटी सामना आहे. दोन्ही संघांत पहिल्यांदा 2018 साली कसोटी सामना खेळवण्यात आला होता. भारताने तेव्हा डावाने अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात अफगाणिस्तानवर विजय मिळवला होता.
भारत-अफगाणिस्तान एकमेव कसोटी सामना
Here’s what we are playing for 🏆
The @IDFCFIRSTBank trophy for the #INDvAFG Test in all its glory 👌
Updates ▶️ https://t.co/Au50EfVM30#TeamIndia pic.twitter.com/UYnDjdoBgM
— BCCI (@BCCI) June 6, 2026
अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन : सेदीकुल्ला अटल, रहमानुउल्लाह गुरबाज, अब्दुल मलिक, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अफसर झझाई (विकेटकीपर), अझमातुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, नांगेलिया खरोटे, झियाउर रहमान शरीफी आणि मोहम्मद सलीम साफी.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, मानव सुथार, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसीध कृष्णा.