AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS Test : Virat Kohli म्हणून संतापाच्या भरात केएस भरतवर ओरडला, VIDEO व्हायरल

IND vs AUS 4th Test : विराट कोहलीच्या संयमी खेळीने ऑस्ट्रेलियन बॉलर्स चांगलेच हैराण झाले. लंचला खेळ थांबला, तेव्हा विराट कोहली 88 धावांवर होता. पहिल्या सेशनमध्ये टीम इंडियाच्या 4 बाद 362 धावा झाल्या होत्या.

IND vs AUS Test : Virat Kohli म्हणून संतापाच्या भरात केएस भरतवर ओरडला, VIDEO व्हायरल
Virat-Kohli Image Credit source: Twitter-Screengrab Hotstar
| Updated on: Mar 12, 2023 | 1:33 PM
Share

IND vs AUS 4th Test : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर सीरीजमधला मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु आहे. या टेस्टमध्ये टीमला गरज असताना विराट कोहलीने झुंजार शतक झळकवल. जवळपास तीन वर्षानंतर विराटने शतकी कामगिरी केलीय. कसोटी क्रिकेटमधील त्याच हे 29 व तर क्रिकेट करिअरमधील 75 व शतक आहे. आज रविवारी चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली. टीम इंडियाने आज सकाळच्या सत्रात रवींद्र जाडेजाच्या रुपाने विकेट गमावली.

309 रन्सवर टीम इंडियाची चौथी विकेट गेली. केएस भरत आज चांगली फलंदाजी करतोय. 131 ओव्हर्समध्ये टीम इंडियाच्या 4 बाद 362 धावा झाल्या होत्या.

टीम इंडियाला ते महाग पडलं असतं

श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे केएस भरतला वरती फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. विराट कोहलीने आज एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी नॉन स्ट्राइकला उभ्या असलेल्या केएस भरतने त्याला नकार दिला. भरतने माघार घेणं कोहलीला आवडलं नाही. ही चोरटी धाव घेण्याच्या नादात विकेट गेली असती, तर टीम इंडियाला ते महाग पडलं असतं. विराट कोहली भरतवर किंचाळला.

बॉलर्स चांगलेच हैराण

विराट कोहलीच्या संयमी खेळीने ऑस्ट्रेलियन बॉलर्स चांगलेच हैराण झाले. लंचला खेळ थांबला, तेव्हा विराट कोहली 88 धावांवर होता. पहिल्या सेशनमध्ये टीम इंडियाच्या 4 बाद 362 धावा झाल्या होत्या. विराटने लंचनंतर सेंच्युरी झळकवली. विराटने त्याच्या शतकी खेळीत फक्त पाच चौकार मारले. श्रीकर भरत 44 रन्सवर आऊट झाला. त्याने 88 चेंडूत 44 धावा केल्या. यात 2 चौकार आणि 3 सिक्स मारले. रवींद्र जाडेजा 84 चेंडूत 28 रन्सवर बाद झाला. त्याने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.