AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS Live Streaming : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

India vs Australia Womens World Cup 2025 Live Match Score : आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील 13 व्या सामन्यात गतविजेता ऑस्ट्रेलिया यजमान टीम इंडिया विरुद्ध भिडणार आहे. या सामन्याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

IND vs AUS Live Streaming : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
INDW vs AUSW Live StreamingImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Oct 11, 2025 | 3:40 PM
Share

भारतीय महिला संघाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत अप्रतिम सुरुवात केली. भारताने श्रीलंका आणि पाकिस्तानला पराभूत करत सलग 2 सामने जिंकले. मात्र टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयी हॅटट्रिक करण्यात अपयशी ठरली. दक्षिण आफ्रिकेने भारताचा विजयरथ रोखला. दक्षिण आफ्रिकेने यासह टीम इंडिया विरुद्ध वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील सलग तिसरा विजय मिळवला. त्यामुळे टीम इंडियाचा पुढील सामन्यात विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असणार आहे.

टीम इंडिया या मोहिमेतील आपला चौथा सामना हा गतविजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. हरमनप्रीत कौर भारताचं नेतृत्व करणार आहे. तर एलिसा हीली ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. हा सामना कुठे आणि कधी होणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.

टीम इंडिया वूमन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सामना केव्हा?

टीम इंडिया वूमन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सामना रविवारी 12 ऑक्टोबरला होणार आहे.

टीम इंडिया वूमन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सामना कुठे?

टीम इंडिया वूमन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सामना विशाखापट्टणममधील डॉक्टर वाय राजशेखरा रेड्डी एसीए व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

टीम इंडिया वूमन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया वूमन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टीम इंडिया वूमन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया वूमन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तसेच सामन्यातील प्रत्येक अपडेट्स https://www.tv9marathi.com या आमच्या वेबसाईटवरील लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेता येतील.

टीम इंडिया वूमन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सामना मोबाईल-लॅपटॉपवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया वूमन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सामना मोबाईल-लॅपटॉपवर जिओ हॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.

दोन्ही संघांची कामगिरी

दरम्यान दोन्ही संघांनी आतपर्यंत प्रत्येकी 3-3 सामने खेळले आहेत. भारताने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर एका सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. तर ऑस्ट्रेलियाने 2 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.

Follow Us
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात