AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Aus: अनुभवी खेळाडू दुखापतग्रस्त, नव्या खेळाडूंवर ब्रिस्बेन कसोटीची मदार, अशी असेल टीम इंडियाची Playing XI

अनेक अनुभवी आणि भरवशाचे खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने टीम इंडियाचा हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेवर प्लेइंग इलेव्हन निवडणं सर्वात मोठं आवाहन असणार आहे.

Ind vs Aus: अनुभवी खेळाडू दुखापतग्रस्त, नव्या खेळाडूंवर ब्रिस्बेन कसोटीची मदार, अशी असेल टीम इंडियाची Playing XI
टीम इंडिया
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jan 15, 2021 | 9:19 AM
Share

सिडनी : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा दुखापतींचा दौरा म्हणून ओळखला जाणार आहे. कारण या दौऱ्यात आणि दौऱ्यापूर्वी गेल्या दोन महिन्यात भारताचे तब्बल 12 खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. दुखापतीमुळे जलदगती गोलंदाज इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी कसोटी मालिका खेळू शकले नाहीत. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापत झाल्याने जलदगती गोलंदाज उमेश यादवदेखील मायदेशी परतला. त्यामुळे टीम इंडियाच्या जलदगती गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर होती. त्याला नवोदित गोलंदाज मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी या दोघांची साथ मिळाली. परंतु तिसऱ्या कसोटी सामन्यात दुखापत झाल्याने आता जसप्रीत बुमराहदेखील चौथ्या कसोटी सामन्याला मुकणार असल्याचे बोलले जात आहे. सिडनी कसोटीत अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाला आहे, तर या सामन्याचा हिरो ठरलेल्या हनुमा विहारीच्या मांडीचे स्नायू दुखावले (हॅमस्ट्रिंग) आहेत. त्यामुळे हे दोन खेळाडूदेखील ब्रिस्बेन कसोटी सामन्यात खेळू शकणार नाहीत. लोकेश राहुलला तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी सराव करताना दुखापत झाली होती. त्यामुळे तोदेखील मायदेशी परतला आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेवर प्लेइंग इलेव्हन निवडणं सर्वात मोठं आवाहन असणार आहे. (IND vs AUS : To choose playing XI in Team India is difficult for captain Ajinkya Rahane)

रोहित आणि शुभमन सलामीला उतरणार

रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या रुपाने गेल्या अनेक महिन्यांपासूनचा भारतीय संघाचा सलामीच्या जोडीचा प्रश्न मिटला आहे. अद्याप या जोडीने मोठी सलामी दिलेली नसली तरी सिडनी कसोटीच्या दोन्ही डावात आक्रमक आणि आश्वासक सुरुवात करुन दिली होती. त्यामुळे ब्रिस्बेन कसोटीत या दोन खेळाडूंना सलामीला पाठवलं जाऊ शकतं. सिडनी कसोटीत या दोघांनी पहिल्या डावात 70 तर दुसऱ्या डावात 71 धावांची सलामी दिली होती. पहिल्या डावात शुभमनने तर दुसऱ्या डावात रोहितने अर्धशतक ठोकलं होतं.

मधल्या फळीची जबाबदारी पुजारा, रहाणे आणि पंतवर

टीम इंडियासमोर अनेक आवाहनं असली तरी त्यांची मधली फळी मजबुत आहे. कारण मधल्या फळीची जबाबदारी चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर आहे. चेतेश्वर पुजारा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये सुरुवातीला प्रभावहीन ठरला होता. पंरतु सिडनी कसोटी सामना वाचवण्यात त्याचाही सिंहाचा वाटा होता. विशेष म्हणजे त्याने सिडनी कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये अर्धशतक ठोकलं होतं. त्यामुळे पुजाराचं फॉर्ममध्ये येणं टीम इंडियासाठी आश्वासक बाब आहे. तर हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणे नेहमीच टीम इंडियासाठी भरवशाचा फलंदाज ठरला आहे. सिडनी कसोटीत त्याची बॅट तळपली नव्हती. मात्र मेलबर्न कसोटी शानदार शतक ठोकून त्याने त्याचा फॉर्म आधीच सिद्ध केला आहे. त्यामुळे टीम इंडियाची मधली फळी सक्षम हातांमध्ये आहे, असं म्हणता येईल. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या ऋषभ पंतला सिडनी कसोटीत पाचव्या क्रमांकावर पाठवण्यात आले होते. संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय योग्य ठरला. तसेच 118 चेंडूत 97 धावा फटकावून पंतने त्याची ताकद दाखवली आहे. त्यामुळे ब्रिस्बेन कसोटीत ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो.

विकेटकीपिंगची जबाबदारी साहावर तर जडेजाच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी

ब्रिस्बेन कसोटीत वृद्धीमान साहा यष्टीरक्षण करताना दिसू शकतो. कारण हनुमा विहारीच्या जागी कोणला संधी द्यायची हा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर आहे. मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ हे दोन फलंदाज आपल्याकडे आहेत. परंतु दोघेही सलामीवीर आहेत. त्यामुळे त्यांना सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवणे एकप्रकारचा जुगार ठरेल. अशा परिस्थितीत संघव्यवस्थापन वृद्धीमान साहालाच पसंती देऊ शकते. कारण यष्टीरक्षणात ऋषभ पंत चांगली कामगिरी करु शकलेला नाही. तसेच वृद्धीमान साहा हा सहाव्या-सातव्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्यामुळे साहाला या सामन्यात संधी मिळू शकते. अष्टपैलू गोलंदाज रवींद्र जाडेजाच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली जाऊ शकते. सुंदरची फिरकी चांगली आहे, तसेच वेळ पडल्यावर तो फलंदाजीदेखील करु शकतो.

सिराज आणि नवदीपची साथ कोण देणार?

तिसऱ्या कसोटी सामन्यात दुखापत झाल्याने जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटी सामन्याला मुकणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान एक चांगली बातमी समोर आली आहे, ती म्हणजे बुमराह आज सकाळी टीम इंडियासोबत नेट्समध्ये सराव करताना दिसला. त्यामुळे जर बुमराह फिट झाला तर भारतीय गोलंदाजीचं नेतृत्व त्याच्याच खांद्यावर सोपवलं जाईल. परंतु बुमराहला विश्रांती दिली गेली तर भारतीय गोलंदाजी खूपच कमकुवत ठरेल. कारण मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही पहिलीच मालिका खेळत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोलंदाजीचा अनुभव नसलेल्या गोलंदाजांसह टीम इंडिया ब्रिस्बेन कसोटीच्या मैदानात उतरेल. दरम्यान, बुमराहच्या जागी कोणाला संधी मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न भारतीय क्रिकेट रसिकांसमोर उभा ठाकला आहे. बुमराहऐवजी शार्दुल ठाकूरला तिसऱ्या गोलंदाजाच्या रुपात संघात स्थान मिळू शकतं. शार्दुल यापूर्वी एक कसोटी सामना खेळला आहे. तसेच काहींच्या मते टी. नटराजनला या सामन्यात संधी द्यायला हवी. दरम्यान फिरकीची कमान रवीचंद्रन अश्विनच्या खांद्यावर असणार आहे.

टीम इंडियाची संभावित प्‍लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे (कर्णधार), ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्‍मद सिराज, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर/जसप्रीत बुमराह, रवीचंद्रन अश्विन.

हेही वाचा

ना शमी, ना उमेश यादव, आता बुमराहचीही कमी, भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा कोण सांभाळणार?

ऋषभ पंतला बाद करण्यासाठी स्टिव्ह स्मिथचा ‘डर्टी गेम’, नेटीझन्सनी झापलं

डेव्हिड वार्नरची इन्स्टाग्राम पोस्ट, टीम इंडियासह मोहम्मद सिराजची मागितली माफी

सिडनी कसोटीचा निकाल वेगळा लागू शकला असता; हनुमा विहारीने व्यक्त केली खंत

(IND vs AUS : To choose playing XI in Team India is difficult for captain Ajinkya Rahane)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या