AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND v AUS : ऋषभ पंतला बाद करण्यासाठी स्टिव्ह स्मिथचा ‘डर्टी गेम’, नेटीझन्सनी झापलं

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना काल संपला. हा सामना ड्रॉ झाला असला तरी या सामन्याची चर्चा अजून काही दिवस सुरु राहील.

IND v AUS : ऋषभ पंतला बाद करण्यासाठी स्टिव्ह स्मिथचा 'डर्टी गेम', नेटीझन्सनी झापलं
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jan 12, 2021 | 12:02 PM
Share

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Aus vs Ind 3rd Test) यांच्यातील तिसरा कसोटी सामना काल संपला. हा सामना ड्रॉ झाला असला तरी या सामन्याची चर्चा अजून काही दिवस सुरु राहील. या सामन्याद्वारे ऋषभ पंत आणि रोहित शर्माने केलेलं कमबॅक, दुखापतग्रस्त हनुमा विहारी आणि रवीचंद्रन अश्विन या दोघांनी सामना वाचवण्यासाठी तब्बल 42 षटकं केलेली चिवट फलंदाजी, भारतीय गोलंदाजांची उत्कृष्ट कामगिरी, ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहवर केलेली वर्णद्वेषी टीका या सगळ्यांची पुढील अनेक दिवस चर्चा होईल. यासोबतच ऑस्ट्रिलियाचा खेळाडू स्टिव्ह स्मिथने खेळलेला डर्टी गेमही अनेकांच्या लक्षात राहणार आहे. (India vs Australia: Steve Smith erases Rishabh Pant’s batting-guard marks)

पाचव्या दिवसाचा खेळ सुरु असताना टीम इंडियाने सकाळच्या सत्रात 102 धावांवर 3 विकेट्स गमावल्या. तिसरी विकेट ही भरवशाचा फलंदाज आणि कर्णधार अजिंक्य रहाणेची होती. त्यामुळे हा सामना भारताच्या हातून निसटला, असे बोलले जाऊ लागले होते. परंतु रहाणे बाद झाल्यानंतर यष्टीरक्षक आणि आक्रमक फलंदाज ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराने टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 148 धावांची शानदार भागीदारी केली. ही भागिदारी कसोटीत चौथ्या डावात चौथ्या विकेटसाठी टीम इंडियाकडून सर्वाधिक धावांची भागीदारी ठरली. सुरुवातीला सावध सुरुवात करणाऱ्या ऋषभ पंतने खेळपट्टीवर सेट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर तुफान हल्ला चढवला.

स्मिथचा ‘डर्टी गेम’

सुरुवातीला 36 चेंडूत 6 धावा करणाऱ्या पंतने ऋषभ पंतने लंचपर्यंत 90 चेंडूत 73 धावा फटकावल्या होत्या. लंचपर्यंत भारताने तीन गड्यांच्या बदल्यात 206 धावा फटकावल्या होत्या. लंचनंतर पंतसह पुजारानेही फटकेबाजी सुरु केली. त्यामुळे पंत-पुजाराची जोडी जोडी हा सामना ऑस्ट्रेलियाच्या हातून हिरावणार असे वाटू लागले होते. ऑस्ट्रेलियन खेळाडूदेखील तणावात दिसत होते. त्यामुळे ऋषभ पंतला बाद करण्यासाठी संपूर्ण ऑस्ट्रेलियन टीम झटत होती. त्याचवेळी स्टिव्ह स्मिथने त्याच्या मूळ अवतारात परत येत ‘डर्टी गेम’ खेळण्याचा प्रयत्न केला. पंतचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न स्मिथ करु लागला.

दुपारच्या ड्रिंक्स ब्रेकमध्ये स्मिथ खेळपट्टीवर गेला आणि त्याने हळूच कोणाचंही लक्ष जाणार नाही याची काळजी घेत खेळपट्टीवरील फलंदाजाने केलेलं बॅटिंग गार्ड मार्क (batting-guard mark) मिटवण्याचा प्रयत्न केला. त्याने खेळपट्टीवर पाय घासून ते मार्किंग मिटवलं. परंतु स्मिथचा डर्टी गेम त्याच्या उपयोगी पडला नाही. कारण ड्रिंक्स ब्रेकनंतर पंत जेव्हा खेळपट्टीवर आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याने केलेलं मार्किंग मुजलं आहे. तेव्हा त्याने पंचांशी बातचित करुन पुन्हा मार्क सेट केला आणि पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर आक्रमण केलं.

व्हिडीओ व्हायरल

स्मिथने केलेल्या या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर कालपासून व्हायरल होत आहे. त्यामुळे सर्वजण त्याला ट्रोल करु लागले आहेत. टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागनेही याचा व्हिडीओ ट्विट करत स्मिथला झापलं आहे. या व्हिडीओत स्मिथचा चेहरा दिसत नसला तरी तो त्याचं काम उरकून निघून जात असताना त्याच्या जर्सीवरील 49 हा नंबर स्पष्ट दिसतोय. ऑस्ट्रेलियन संघात या नंबरची जर्सी घालून स्मिथ मैदानात उतरतो.

व्हिडीओ पाहा

संबंधित बातम्या

‘तू तो देवमाणूस निकला रे’; दुखापतीनंतरही आक्रमक 97 फटकावणाऱ्या ऋषभ पंतवर कौतुकाचा वर्षाव

IND vs AUS : 23 वर्षीय ऋषभ पंतने इतिहास रचला, ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच विकेटकीपर

Aus vs Ind, 3rd Test | पंत-पुजाराची कमाल, 72 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक

ना शमी, ना उमेश यादव, आता बुमराहचीही कमी, भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा कोण सांभाळणार?

(India vs Australia: Steve Smith erases Rishabh Pant’s batting-guard marks)

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!