‘तू तो देवमाणूस निकला रे’; दुखापतीनंतरही आक्रमक 97 फटकावणाऱ्या ऋषभ पंतवर कौतुकाचा वर्षाव

ऋषभ पंत फलंदाजी करत असताना सिडनी कसोटी सामना भारत सहज जिंकेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती,

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:34 PM, 11 Jan 2021
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं एक मिम.

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियातील (Aus vs Ind 3rd Test) तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सध्या सुरु आहे. या सामन्यातील चौथ्या दिवसावर ऑस्ट्रेलियन संघाने वर्चस्व गाजवलं होतं. परंतु पाचवा दिवस भारतीय संघाचा होता. त्यातही प्रामुख्याने ऋषभ पंतने आजच्या सामन्यातील खेळीने सर्वांची मनं जिंकली आहेत. जे क्रीडा समीक्षक, क्रिकेटप्रेमी विकेटकीपिंगवरुन आणि गेल्या काही सामन्यातील फलंदाजीतील परफॉर्मन्सवरुन पंतवर टीका करत होते, त्यांनीही आजच्या पंतच्या परफॉर्मन्सवरुन त्याचं कौतुक केलं आहे. (Rishabh Pant smashes 97 netizens applaud)

टीम इंडियाने काल (रविवारी) सामन्याच्या चौथ्या दिवसअखेर 2 विकेट गमावून 98 धावा केल्या होत्या. तेव्हा चेतेश्वर पुजारा 9 तर अजिंक्य रहाणे 4 धावांवर नाबाद होते. परंतु आज भारताची सुरुवात खूप वाईट झाली. सकाळी सुरुवातीलाच रहाणे (4) बाद झाला. त्यामुळे भारतीय संघ बॅकफुटवर गेला होता. परंतु विस्फोटक फलंदाज ऋषभ पंत आणि भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा या दोघांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पंतने आज वनडे मॅचच्या स्टाईलमध्ये फलंदाजी करत 118 चेंडूत 97 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 3 षटकार ठोकले तर पुजाराने 205 चेंडूत 12 चौकारांच्या सहाय्याने 77 धावा जमवल्या. (Ind vs Aus Rishabh Pant classic form continues in Australia)

ऋषभ पंत फलंदाजी करत असताना हा सामना भारत सहज जिंकेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती, तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियन टीम मात्र चिंतेत होती. परंतु पंत 97 धावांवर बाद झाल्याने भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या. भारत या सामन्यात पराभूत झाला असता, परंतु ऋषभ पंत, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहार आणि रवीचंद्रन अश्विन या खेळाडूंनी भारताला पराजयापासून दूर ठेवले. या सामन्यातील ऋषभ पंतच्या खेळीचं सध्या कूप कौतुक होतंय. #RishabhPant हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंड होतोय, सोबतच पंतचं कौतुक करणारे मिम्सही व्हायरल होत आहेत.

हेही वाचा

पंत-पुजाराची कमाल, 72 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक

23 वर्षीय ऋषभ पंतने इतिहास रचला, ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच विकेटकीपर

डाकेबाज फलंदाज ऋषभ पंतची मोठ्या विक्रमाला गवसणी, कोणालाही न जमलेली कामगिरी साध्य

(Rishabh Pant smashes 97 netizens applaud)