
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 36 व्या सामन्यात ए ग्रुपमधील टीम इंडिया आणि नेदरलँड्स आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना आहे. या सामन्याचं आयोजन हे गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याच्या थराराला थोड्याच वेळात अर्थात संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहत्यांना नेदरलँड्स विरुद्ध मोठी धावसंख्या पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सूर्यासेना नेदरलँड्स विरुद्ध किती धावसंख्या उभारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम मॅनेजमेंटकडून भारतीय संघात 2 बदल करण्यात आले आहेत. उपकर्णधार आणि ऑलराउंडर अक्षर पटेल याला विश्रांती देण्यात आली आहे. अक्षरच्या जागी वॉशिंग्टन सुंदर याचा समावेश करण्यात आला आहे. सुंदरचं यासह कमबॅक झालं आहे. सुंदरला न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत दुखापत झाली होती. तेव्हापासून सुंदर टीममधून बाहेर होता. तर फिरकीपटू कुलदीप यादव याच्या जागी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याचा समावेश करण्यात आला आहे. तर नेदरलँड्सकडून बदल करण्यात आला आहे. नेदरलँड्सने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे.
टीम इंडियाने आतापर्यंत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सलग 11 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने गेल्या टी 20i वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत सलग 8 सामने जिंकले होते. त्यानंतर आता या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने साखळी फेरीत 3 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने यूएसए, नामिबिया आणि पाकिस्तानला पराभूत केलं आहे. त्यामुळे आता टीम इंडिया नेदरलँड्स विरुद्ध विजय मिळवून वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग 12 वा सामना जिंकणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : इशान किशन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आण अर्शदीप सिंग.
नेदलँड्स प्लेइंग ईलेव्हन : मायकेल लेविट, मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, कॉलिन एकरमन, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), झॅक लायन-कॅशेट, नोहा क्रोस, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त आणि काइल क्लेन.