AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : टीम इंडियात दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल फिक्स, कुणाला संधी?

India vs New Zealadn 2nd Odi : टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. भारतीय संघ या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करणार असल्याचं निश्चित आहे.

IND vs NZ : टीम इंडियात दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल फिक्स, कुणाला संधी?
IND vs NZ Odi Series 2026 National AnthemImage Credit source: @Sundarwashi5 X Account
| Updated on: Jan 12, 2026 | 9:50 PM
Share

टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात 2026 वर्षात अप्रतिम सुरुवात केली. भारताने नववर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्या आणि एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला. भारताने न्यूझीलंड विरूद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विजयी सलामी दिली. भारताने रविवारी 11 जानेवारीला झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला. शुबमन आणि श्रेयस अय्यर या दोघांनी दुखापतीनंतर कडक कमबॅक केलं. कर्णधार शुबमन गिल याने या सामन्यात 255 धावांचा पाठलाग करताना अर्धशतक झळकावलं. उपकर्णधार श्रेयस अय्यर याने 49 धावांचं योगदान दिलं.

तर अनुभवी फलंदाज विराट कोहली याने सर्वाधिक धावा केल्या. विराटचं शतक अवघ्या 7 धावांनी हुकलं. विराटने 93 धावा केल्या. केएल राहुल याने 29 धावा जोडल्या. तर हर्षित राणा याने बॉलिंगसह बॅटिंगनेही निर्णायक योगदान दिलं. हर्षितने 2 विकेट्स मिळवल्या. तसेच निर्णायक क्षणी 29 धावांची खेळी करत भारताच्या विजयात अमूल्य असं योगदान दिलं.  त्यानंतर आता उभयसंघातील दुसरा सामना हा बुधवारी 14 जानेवारीला होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणार असल्याचं निश्चित आहे.

बदल करण्याची गरज काय?

साधारणपणे विजयी संघाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करत नाहीत, असा अलिखित नियम आहे. मात्र त्यानंतरही टीम मॅनेजमेंटला न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी नाईलाजाने बदल करावा लागणार आहे. भारताचा ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याला पहिल्या सामन्यात बॉलिंग करताना दुखापत झाली. सुंदर आणि टीम इंडियाला ही दुखापत महागात पडली. सुदंरला या दुखापतीमुळे उर्वरित 2 सामन्यांमधून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे सुंदरच्या दुखापतीमुळे टीम मॅनेजमेंटनला प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करावा लागणार आहे.

वॉशिंग्टन सुंदर याच्या जागी कुणाला संधी मिळणार?

दरम्यान वॉशिंग्टन सुंदर याला  बाहेर व्हावं लागल्याने त्याच्या जागी उर्वरित मालिकेतील 2 सामन्यांसाठी आयुष बडोनी याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच त्याआधी विकेटकीपर ऋषभ पंत याला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलंय. पंतच्या जागी या मालिकेत ध्रुव जुरेल याचा समावेश करण्यात आला आहे. आयुष आणि ध्रुवपैकी कुणाचंही एकदिवसीय पदार्पण झालेलं नाही. त्यामुळे टीम मॅनेजमेंट या दोघांपैकी कुणा एकाचा समावेश करणार की दुसऱ्याला संधी देणार? यासाठी टॉसपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...