AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs SL: पहिल्या T20 मध्ये ‘या’ प्लेयरचा डेब्यु? रोहित शर्मासारखा धोकादायक फलंदाज

Ind vs SL: भारत आणि श्रीलंकेमध्ये 3 जानेवारीला पहिला टी 20 सामना खेळला जाणार आहे. या मॅचमध्ये भारताकडून एक खेळाडू डेब्यु करु शकतो. हा प्लेयर सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे.

Ind vs SL: पहिल्या T20 मध्ये 'या' प्लेयरचा डेब्यु? रोहित शर्मासारखा धोकादायक फलंदाज
rohit sharma
| Updated on: Jan 02, 2023 | 3:20 PM
Share

India vs Sri Lanka T20 Series: भारत आणि श्रीलंकेमध्ये तीन टी 20 सामन्यांची सीरीज होणार आहे. या सीरीजचा पहिला सामना 3 जानेवारीला खेळला जाईल. या टी 20 सीरीजमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलला विश्रांती दिलीय. टीम इंडियाच नेतृत्व हार्दिक पंड्याच्या हाती आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली एका स्टार खेळाडूला डेब्युची संधी मिळू शकते. हा खेळाडू स्फोटक फलंदाजी करु शकतो. जाणून घेऊया या प्लेयरबद्दल.

हा खेळाडू करु शकतो डेब्यु?

श्रीलंकेविरुद्ध हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली शुभमन गिलला भारताकडून संधी मिळू शकते. संधी मिळाल्यास शुभमन गिलचा हा डेब्यु ठरेल. गिल सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याला न्यूझीलंड विरुद्ध सीरीजमध्येही संधी मिळाली होती. पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. गिल फॉर्ममध्ये असेल, तर तो कुठल्याही गोलंदाजी आक्रमणाची वाट लावू शकतो.

टेस्ट मॅचमध्ये दाखवलाय जलवा

शुभमन गिलने टेस्ट आणि वनडेमध्ये आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवलाय. काही क्रिकेट तज्ज्ञांच्या मते हा सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीसारखी बॅटिंग करतो. प्रतिस्पर्धी टीमच्या गोलंदाजांची धार बोथट करण्यासाठी त्याच्याकडे प्रत्येक प्रकारचे फटके आहेत. रोहित शर्मा सारखी करतो फलंदाजी

शुभमन गिल रोहित शर्मासारखी बॅटिंग करतो. 23 वर्षाचा गिल एकदा क्रीजवर टीकला, तर तो मोठी इनिंग खेळू शकतो. IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्सकडून त्याने जबरदस्त बॅटिंग केली होती. गिलने भारताकडून खेळताना 13 टेस्ट मॅचमध्ये 736 धावा आणि 15 वनडे सामन्यात 687 रन्स केल्यात.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.