
कोलंबो | टीम इंडिया आशिया कप 2023 सुपर 4 मधील सामन्यात पाकिस्तानचा 228 धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडियाने पाकिस्तान विजयासाठी 357 धावांचे आव्हान दिले होते.मात्र पाकिस्तानला 32 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 128 धावाच करता आल्या. तर उर्वरित दोघे दुखापतीमुळे बॅटिंग करु शकले नाहीत. टीम इंडिया अशाप्रकारे विजयी झाली. सामन्याचा निकाल राखीव दिवसात लागल्याने टीम इंडियाला आता सलग तिसऱ्या दिवशीही खेळावं लागणार आहे. पाकिस्तान विरुद्ध मुख्य दिवशी सामना पूर्ण होऊ न शकल्याने राखीव दिवसापर्यंत सामना पोहचला. त्यानंतर आता 12 सप्टेंबर रोजी टीम इंडियासमोर श्रीलंका टीमचं आव्हान असणार आहे. टीम इंडिया सलग 3 दिवस खेळणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्याचं आयोजन हे आर प्रेमदासा स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. दासून शनाका श्रीलंकेचं तर रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. या सामन्याआधी श्रीलंका आणि टीम इंडिया या दोघांपैकी सरस कोण आहे? या दोन्ही संघांपैकी कुणी सर्वाधिक सामने जिंकले आहेत, हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 165 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये टीम इंडियाचा वरचष्मा राहिला आहे. टीम इंडियाने 165 पैकी 96 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेने 57 सामन्यात विजय मिळवला आहे. 1 सामना टाय राहिला. तर 11 सामन्यांचा निकाल लागू शकला नाहीये.
दरम्यान श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासमोर मोठं आव्हान असणार आहे. श्रीलंकेने 13 वनडे सामने सलग जिंकले आहेत. इतकंच नाही, तर 13 सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघांना ऑलआऊट केलंय. त्यामुळे टीम इंडियाच्या कडक बॅटिंग ऑर्डरसमोर श्रीलंकेच्या बॉलिंग ऑर्डरचं आव्हान असणार आहे.
रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकुर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि तिलक वर्मा.
दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, चरिथ असलांका, धनंजय डी सिल्वा, मथीशा पथिराना, सदीरा समरविक्रमा, महीश थेक्षाना, डुनिथ वेललागे, कासुन राजिथा, दुशान हेमंथा, बिनुरा फर्नांडो आणि प्रमोद मदुशन.