AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind Vs SL Live Streaming | टीम इंडिया सलग तिसऱ्या दिवशी मैदानात, श्रीलंका विरुद्धचा सामना कुठे आणि कधी पाहता येणार?

sri lanka vs india live streaming | पाकिस्तानला पराभवाची धुळ चारल्यानंतर टीम इंडिया श्रीलंका विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज आहे. उभयसंघातील सामना टीव्ही आणि मोबाईलवर फ्री कसा पाहायचा ते जाणून घ्या.

Ind Vs SL Live Streaming | टीम इंडिया सलग तिसऱ्या दिवशी मैदानात, श्रीलंका विरुद्धचा सामना कुठे आणि कधी पाहता येणार?
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Sep 12, 2023 | 1:42 AM
Share

कोलंबो | पाकिस्तान क्रिकेट टीमचा 228 धावांनी धुव्वा उडवल्यानंतर टीम इंडिया आता श्रीलंकेचा विजयरथ रोखण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया आशिया कप 2023 मधील आपला दुसरा सामना हा श्रीलंका विरुद्ध 12 सप्टेंबर रोजी खेळणार आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील मुख्य दिवसातील (10 सप्टेंबर) सामना हा रद्द झाला. त्यामुळे सामना दुसऱ्या म्हणजेच राखीव दिवशी (11 सप्टेंबर) निकाली निघाला. त्यामुळे आता टीम इंडिया श्रीलंका विरुद्ध मैदानात उतरताच सलग 3 दिवस मॅच खेलणारी टीम ठरेल. दरम्यान टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सुपर 3 मधील सामना हा मंगळवारी 12 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना कुठे पार पडणार?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामन्याचं आयोजन हे कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये करण्यात आलंय.

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना किती वाजता सुरु होणार?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर फ्री कुठे पाहता येणार?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्सवर फुकटात पाहता येईल. तसेच स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरही सामन्याचा आनंद घेता येईल.

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना मोबाईलवर फ्री कसा पाहायचा?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना मोबाईलवरही फ्री पाहता येईल. हॉटस्टार ॲपवर सामना मोफत पाहायला मिळेल.

आशिया कपसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, के.एल.राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा.

श्रीलंका क्रिकेट टीम

दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पाथुम निसानाका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, चैरिथ असलांका, धनंजय डी सिल्वा, मथीशा पथिराना, सदीरा समरविक्रमा, महीश थीक्षाना, डुनिथ वेललागे, कासुन राजिथा, दुशान हेमंथा , बिनुरा फर्नांडो आणि प्रमोद मदुशन.

Follow Us
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप