विराट कोहलीवर मोठा अन्याय? आऊट नसताना अम्पायरनं घोळ घातला? व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांचा संताप
Virat Kohli Wicket News: गुवाहाटीत विराट कोहलीची बॅट शांत दिसली. रदरफोर्डच्या अफलातून कॅचने किंग कोहली बाद झाल्याचे पाहायला मिळाले.

भारतीय कर्णधार शुभमन गिलने गुवाहाटीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार फलंदाजी केली. त्याने अवघ्या ६२ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. गिलने आपल्या खेळीत १० चौकार आणि ५ षटकार मारले. यानंतर अनुभवी फलंदाज रोहित शर्माची बॅट वेस्ट इंडिजविरुद्ध धुमाकूळ घालून गेली. गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितने अवघ्या ७२ चेंडूंमध्ये शतक ठोकले. तो १०१ धावांवर बाद झाला. यानंतर विराट कोहली फलंदाजीसाठी आला आहे. मात्र तो आश्चर्यकारकपणे बाद झाला. त्याचा चकीत करणारा झेल घेतला आहे.
गुवाहाटी येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला पहिला धक्का बसला आहे. शतक झळकावल्यानंतर रोहित शर्मा बाद झाला आहे. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडन सील्सने त्याला खेळवले. यामुळे रोहित आणि कर्णधार शुभमन गिल यांच्यातील २५५ धावांची सलामीची भागीदारीही संपुष्टात आली. ७५ चेंडूंमध्ये १०१ धावा करून रोहित बाद झाला. यानंतर विराट कोहली फलंदाजीसाठी आला आहे.
🚨🚨 OUT OUT OUT 🚨🚨
Virat Kohli Is gone 😱
Superb catch by Sherfane Rutherford boundry line.🏟️
He judged it well, kept his balance, threw the ball up and came back in from outside the rope to complete the catch.#INDvsWI #RoKo #ViratKohli #Wicket #RohitSharma #ShubhmanGill pic.twitter.com/lVjsiij3z9
— Bhadresh Prajapati (@bhadresh_33) September 30, 2026
पण नंतर वेस्ट इंडिजविरुद्ध भारताला दुसरा धक्का बसला. गुवाहाटीमध्ये अनुभवी फलंदाज विराट कोहलीची मोठी धावसंख्या करण्याची संधी हुकली. शेर्फेन रदरफोर्डने शमर जोसेफच्या गोलंदाजीवर एक अप्रतिम झेल पकडून कोहलीचा डाव संपुष्टात आणला. विराट १९ चेंडूंमध्ये २९ धावांवर बाद झाला. यानंतर ऋतुराज गायकवाड फलंदाजीसाठी आला आहे.
#INDvWI Common In India we don’t many angles to see the catch of Virat Kohli ??? U r richest board in cricketing world & u don’t have cameras to see another angle ??? Really What we say now !!!
— Swapnil Tarsode (@swapshah22) September 30, 2026
या सामन्यात भारतापुढील लक्ष्य ४०६ धावा आहेत. भारताने एकदिवसीय सामन्यांमध्ये आतापर्यंत ३६० धावांचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग केला आहे. भारतासमोर ४०० हून अधिक धावांचे लक्ष्य येण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, २०१५ मध्ये, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४३९ धावांचा पाठलाग करताना भारताला २१४ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला होता.
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात, ४०० पेक्षा जास्त धावसंख्येचा पाठलाग फक्त एकदाच यशस्वी झाला आहे. हा पराक्रम २० वर्षांपूर्वी २००६ साली घडला होता. पाचवा एकदिवसीय सामना जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ४ गडी गमावून ४३४ धावा केल्या. पहिल्या डावानंतर दक्षिण आफ्रिका जिंकेल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती.