IND vs AUS ODI : Mohammed Siraj ने ट्रेविस हेडला आधी लॉलीपॉप दिलं, मग गेम ओव्हर, पहा VIDEO

IND vs AUS 1st ODI : मोहम्मद सिराजने हेडला फसवण्यासाठी ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर प्लान सेट केला. त्याने चौथा चेंडू शॉर्ट टाकला. त्यावर हेडने कट शॉट मारुन चौकार वसूल केला. त्यानंतर पुढचा चेंडू पुन्हा शॉर्ट टाकला.

IND vs AUS ODI : Mohammed Siraj ने ट्रेविस हेडला आधी लॉलीपॉप दिलं, मग गेम ओव्हर, पहा VIDEO
ind vs aus
Image Credit source: star sports
| Updated on: Mar 17, 2023 | 4:44 PM

IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने तो वनडे क्रिकेटमधील नंबर 1 बॉलर का आहे? ते पुन्हा एकदा सिद्ध केलय. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मोहम्मद सिराजने पावरप्लेमध्ये कमालीची गोलंदाजी केली. त्याने टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर ऑस्ट्रेलियन ओपनर ट्रेविस हेड बोल्ड झाला. ट्रेविस हेड चेंडू खेळण्यासाठी दोन पावलं पुढे आला होता. पण सिराजच्या चेंडूसमोर त्याची टेक्निक चालली नाही.

मोहम्मद सिराजने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला पहिला झटका दिला. सिराजने ओव्हरच्या लास्ट बॉलवर ट्रेविस हेडला बोल्ड केलं. चेंडू हेडच्या बॅटच्या आतल्या बाजूला लागून स्टम्पसवर आदळला.

सिराजने हेडला असं फसवलं

मोहम्मद सिराजने हेडला फसवण्यासाठी ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर प्लान सेट केला. त्याने चौथा चेंडू शॉर्ट टाकला. त्यावर हेडने कट शॉट मारुन चौकार वसूल केला. त्यानंतर पुढचा चेंडू पुन्हा शॉर्ट टाकला. ओव्हरमधील लास्ट बॉल सिराजने पुढे टाकला. हेडने तिथेच चूक केली. तो चेंडू खेळण्यासाठी दोन पावलं पुढे आला. पण सिराजचा चेंडू पीचवर पडल्यानंतर थोडा मूव्ह झाला. हेडने बॅट चेंडूच्या दिशेने नेली. चेंडू बॅटच्या आतल्या बाजूला लागून स्टम्पसवर आला. हेडचा खेळ संपला होता.


मोहम्मद सिराजचा जलवा

मोहम्मद सिराज मागच्या वर्षभरापासून वनडे फॉर्मेटमधील बेस्ट बॉलर आहे. या वेगवान गोलंदाजाने 2022 मध्ये 21 सामन्यात 39 विकेट घेतले. त्याने प्रतिओव्हर 4.4 रन्सच दिलेत. याच आकड्यांमुळे मोहम्मद सिराज वनडेमध्ये नंबर एक बॉलर आहे.

टीममध्ये दोन ऑलराऊंडर्स

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मॅच सुरु आहे. हार्दिक पंड्याने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला पहिली बॅटिंग दिली. टीम इंडिया तीन वेगवान गोलंदाज आणि दोन ऑलराऊंडर्ससह मैदानात उतरलीय.

भारताची प्लेइंग इलेनव्हन- इशान किशन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेवहन- मिचेल मार्श, ट्रेविस हेड, स्टीव स्मिथ (कॅप्टन), मार्नस लाबुशेन, जॉश इंग्लिस, मार्कस स्टोइनिस, सीन एबॉट, कॅमरुन ग्रीन,ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क आणि एडम जम्पा