IND vs AUS : तिसऱ्या वनडेसाठी रोहित शर्मा घेणार कठोर निर्णय, 3 मोठ्या खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता

| Updated on: Mar 21, 2023 | 9:33 AM

India vs Australia 3rd ODI : वनडे सीरीज जिंकण्यासाठी टीम इंडियाला चेन्नईमध्ये होणारा तिसरा वनडे सामना जिंकणं आवश्यक आहे. त्यासाठी कॅप्टन रोहित शर्माला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. तीन मोठ्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल.

IND vs AUS : तिसऱ्या वनडेसाठी रोहित शर्मा घेणार कठोर निर्णय, 3 मोठ्या खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता
Follow us on

India vs Australia 3rd ODI : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये चेन्नई येथे तिसरा वनडे सामना होणार आहे. सीरीजमधील हा शेवटचा वनडे सामना आहे. तिसरी मॅच जिंकणारा संघ मालिकाविजेता ठरणार आहे. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मा या तिसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये महत्वाचे बदल करु शकतो. चेन्नईतील तिसऱ्या वनडेत तीन खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये कदाचित स्थान मिळणार नाही. रोहित या तिघांना ड्रॉ़प करु शकतो. रोहितला मायदेशात मालिका गमावण्याचा डाग नकोय. त्यामुळे तिसऱ्या वनडेसाठी तो काही कठोर निर्णय घेऊ शकतो.

दुसऱ्या वनडेमध्ये हे तीन खेळाडू टीम इंडियाच्या पराभवाला कारण ठरले होते. ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या वनडे मॅचसाठी रोहित शर्मा टीममध्ये कुठले मोठे बदल करु शकतो, ते जाणून घेऊया.

पहिला हा प्लेयर ड्रॉप होणार

रोहित शर्मा कुठल्या तीन खेळाडूंना टीममधून ड्रॉप करु शकतो, त्या बद्दल जाणून घेऊया. सर्वप्रथम सूर्यकुमार यादवच नाव आहे. सूर्यकुमार यादवला या सीरीजमधील पहिल्या दोन वनडे सामन्यात संधी देण्यात आली. पण तो प्रभाव पाडू शकला नाही. दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या जागी त्याला संधी मिळाली होती. पण त्याला त्याचा फायदा उचलता आला नाही. सूर्यकुमार 4 व्या क्रमांकावर फ्लॉप ठरला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन वनडे मॅचमध्ये तो सलग दोनवेळा गोल्डन डकवर आऊट झाला. रोहित शर्मा तिसऱ्या वनडेमध्ये सूर्यकुमारला ड्रॉप करुन त्याच्याजागी इशान किशनला संधी देऊ शकतो.

प्लेइंग इलेव्हनमध्ये दुसरा बदल काय असेल?

रोहित शर्मा टीममध्ये दुसरा बदल कुलदीप यादवच्या रुपाने करु शकतो. रोहित कुलदीपला बाहेर बसवू शकतो. कुलदीपला दुसऱ्या वनडेत वाट्याला फक्त एक ओव्हर आली. त्याने त्याने 12 धावा दिल्या. कुलदीप बॅटिंगही चांगली करु शकला नाही. त्याने अवघ्या 4 रन्स केल्या. रोहित कुलदीप यादवला बाहेर बसवून त्याच्याजागी स्पीड गन उमरान मलिकला संधी देऊ शकतो. उमरान ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी करु शकतो. उमरानची गोलंदाजी चालली, तर ऑस्ट्रेलियन दिग्गज हतबल ठरतील. उमरान मलिक भारताकडून 8 वनडे आणि 8 टी 20 सामने खेळलाय. 8 वनडे मॅचमध्ये त्याने 13 विकेट काढलेत.

तिसरा बदल काय असेल?

रोहित शर्मा टीममध्ये तिसरा बदल अक्षर पटेलच्या रुपाने करु शकतो. अक्षर पटेल फॉर्ममध्ये आहे. पण अक्षर सारखीच बॉलिंग-बॅटिंग करणारा रवींद्र जाडेजा टीममध्ये आहे. त्यामुळे गोलंदाजीत वैविध्य नाहीय. अक्षरच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकतो. तो सुद्धा अक्षर सारखाच ऑलराऊंडर आहे. व़ॉशिंग्टनमुळे ऑफ स्पिन गोलंदाजीचा पर्याय मिळतो.

तिसऱ्या वनडेसाठी अशी असेल प्लेइंग 11

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, उमरान मलिक, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज