KL Rahul च्या हाफ सेंच्युरीवर अथिया शेट्टीची Reaction कशी असेल? पहा नेटीझन्सचा कल्पनाविलास

राहुलच्या इनिंगनंतर टि्वटरवर आज एकापेक्षाएक भन्नाट मीम्स व्हायरल झालेत

KL Rahul च्या हाफ सेंच्युरीवर अथिया शेट्टीची Reaction कशी असेल? पहा नेटीझन्सचा कल्पनाविलास
Athiya-Rahul
Image Credit source: twitter
| Updated on: Nov 02, 2022 | 3:40 PM

एडिलेड: टीम इंडियाचा ओपनर केएल राहुल आज जबरदस्त खेळला. टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये अपयशी ठरत असल्याने त्याच्यावर टीका सुरु होती. मागच्या तीन सामन्यात तो फेल गेला होता. त्यामुळे केएल राहुल टीममध्ये कशाला हवा? त्याला बाहेर बसवा? अशी मागणी क्रिकेटप्रेमींकडून सुरु होती. पण कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांनी केएल राहुलवर विश्वास ठेवला. आज बांग्लादेश विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात राहुलने त्याच्यावरच विश्वास सार्थ ठरवला.

आज दाखवून दिलं

कॅप्टन रोहित शर्मा लवकर बाद झाला. त्यावेळी टीमला एका चांगल्या भागीदाराची आवश्यकता होती. राहुलने विराटच्या साथीने डाव सावरला. बांग्लादेशच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवला. त्याने आज 31 चेंडूत अर्धशतक झळकावलं.

नेटीझन्सचा भन्नाट कल्पनाविलास

हाफ सेंच्युरीनंतर राहुल लगेच बाद झाला. पण त्याने लगावलेले फटके लाजवाब होते. राहुलच्या या इनिंगनंतर टि्वटवर मीम्सचा पूर आलाय. राहुलच्या या इनिंगनंतर नेटीझन्स वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत आहेत. एका टि्वटर युजरने राहुलच्या हाफ सेंच्युरीनंतर अथिया शेट्टीची Reaction कशी असेल? यावर भन्नाट टि्वट केलय.

बांग्लादेशला विजयासाठी किती धावा हव्या?

सेमीफायनलमध्ये प्रवेशाच्या दृष्टीने टीम इंडियासाठी ही मॅच महत्त्वाची आहे. T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये पुढे प्रवास सुरु ठेवण्यासाठी टीम इंडियाला आजची मॅच जिंकावीच लागेल. टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 184 धावा केल्या. बांग्लादेशला विजयासाठी 185 धावांची गरज आहे.