AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs England 1st Test | पहिल्या डावात हिट, दुसऱ्या डावात फ्लॉप, लोकल बॉय वॉशिंग्टन सुंदरचा खराब रेकॉर्ड

वॉशिंग्टंन सुंदरने (Washington Sundar) इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात नाबाद 85 धावांची खेळी केली.

India vs England 1st Test | पहिल्या डावात हिट, दुसऱ्या डावात फ्लॉप, लोकल बॉय वॉशिंग्टन सुंदरचा खराब रेकॉर्ड
वॉशिंग्टन सुंदर
| Updated on: Feb 09, 2021 | 5:49 PM
Share

चेन्नई : कर्णधार जो रुटच्या नेतृत्वात इंग्लंडने टीम इंडियावर पहिल्या कसोटीमध्ये (India vs England 1st Test) 227 धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. इंग्लंडने भारताला विजयासाठी 420 धावांचे आव्हान दिले होते. टीम इंडियाला प्रत्युतरात केवळ 192 धावाच करता आल्या. दुसऱ्या डावात विराट कोहली आणि शुबमन गिलचा अपवाद वगळता सर्व फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. पहिल्या डावात 85 धावांवर नाबाद राहिलेला लोकल बॉय वॉशिंग्टन सुंदरही दुसऱ्या डावात अपयशी ठरला. सुदंरला दुसऱ्या डावात भोपळाही फोडता आला नाही. यासह सुंदरच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. (india vs england 1st test 5th day washington sundar sets bad record)

सुंदरच्या नावे खराब विक्रमाची नोंद

हा पहिला कसोटी सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम मैदानात खेळवण्यात आला होता. हे मैदान सुंदरचं होम ग्राऊंड आहे. सुंदरने पहिल्या डावात आपल्या होम ग्राऊंडवर शानदार खेळी केली. पण दुसऱ्या डावात तो अपयशी ठरला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. वॉशिंग्टन 1994 नंतर पहिल्यांदाच टीम इंडियाच्या टॉप 7 फलंदाजांपैकी आपल्या होम ग्राऊंडवर भोपळा न फोडू शकणारा फलंदाज ठरला आहे.

पहिल्या डावात शानदार खेळी

पहिल्या डावात टीम इंडियाची सेट जोडी बाद झाल्यानंतर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने किल्ला लढवला. मात्र त्याला शेपटीच्या फलंदाजांना योग्य साथ देता आली नाही. वॉशिग्टंने सुंदर पहिल्या डावात 138 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 85 धावांची खेळी केली.

टीम इंडियाचा कसोटीमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वातील सलग चौथा पराभव ठरला. फेब्रुवारी 2020 पासून म्हणजेच गेल्या वर्षभरात टीम इंडिया विराटच्या नेतृत्वात एकूण 4 कसोटी सामने खेळली आहे. या 4 ही सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. भारताला 2 वेळा न्यूझीलंज तर प्रत्येकी 1 वेळा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून पराभूत व्हाव लागलं आहे.

दरम्यान या पेटीएम टेस्ट सीरिजमधील दुसरा कसोटी सामना याच मैदानात 13 ते 17 फेब्रुवारीदरम्यान खेळण्यात येणार आहे. या सामन्यात जोरदार पुनरागमन करण्याचा मानस टीम इंडियाचा असणार आहे. या दुसऱ्या सामन्यात स्टेडियममध्ये प्रेक्षकांना उपस्थित राहून मॅचचा आनंद घेता येणार आहे. एकूण क्षमतेच्या 50 टक्के चाहत्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहता येणार आहे.

संबंधित बातम्या :

Virat Kohli | ‘रनमशीन’ कॅप्टन विराट कोहलीची विक्रमाला गवसणी, क्लाइव लॉईड यांना पछाडलं

India vs England 1st Test | इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव, त्यानंतरही कॅप्टन कोहलीचा ‘विराट’ विक्रम

India vs England : चेन्नई कसोटीत टीम इंडियाचे ‘हे’ 5 शिलेदार ठरले खलनायक!

(india vs england 1st test 5th day washington sundar sets bad record)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...