Virat Kohli | ‘रनमशीन’ कॅप्टन विराट कोहलीची विक्रमाला गवसणी, क्लाइव लॉईड यांना पछाडलं

Virat Kohli | 'रनमशीन' कॅप्टन विराट कोहलीची विक्रमाला गवसणी, क्लाइव लॉईड यांना पछाडलं
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या चौथ्या कसोटीत (India vs England 4th Test) ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा (Ricky Ponting) रेकॉर्ड ब्रेक करण्याचा संधी आहे.

विराट कोहलीने (Virat Kohli) इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात 72 धावांची झुंजार खेळी केली

sanjay patil

|

Feb 09, 2021 | 4:51 PM

चेन्नई : इंग्लंडने टीम इंडियावर पेटीएम टेस्ट सीरिजमधील पहिल्या कसोटीत (India vs England 1st Test) 227 धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने 4 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाला 192 धावाच करता आल्या. दुसऱ्या डावात टीम इंडियाकडून कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) सर्वाधिक 72 धावांची अर्धशतकी खेळी केली. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 28 वं अर्धशतक ठरलं. यासह त्याने मानाच्या पंक्तीत आणखी एका क्रमांकाने झेप घेतली आहे. (india vs england 1st test 5th day virat kohli broke Clive Lloyd record for most test runs as captain)

नक्की काय आहे विक्रम?

विराट कसोटीमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. त्याने वेस्ट इंडिजच्या क्लाइव लॉईड (Clive Lloyd) यांना पछाडत चौथा क्रमांक पटकावला आहे. लॉईड यांनी 74 कसोटींमध्ये नेतृत्व करताना 14 शतक आणि 27 अर्धशतकांसह 5 हजार 233 धावा केल्या आहेत. तर विराटने अवघ्या 57 सामन्यांमध्येच ही कामगिरी केली आहे. विराटने यामध्ये 20 शतक आणि 14 अर्धशतक लगावत चौथा क्रमांक पटकावला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथच्या नावावर आहे. स्मिथने कर्णधार म्हणून 8 हजार 659 धावा केल्या आहेत. यात त्याने 25 शतक आणि 36 अर्धशतक ठोकले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाच्ये अॅलन बॉर्डर तर तिसऱ्या क्रमांकावर रिकी पॉन्टिंग आहे.

भारताचा चौथा कसोटी पराभव

टीम इंडियाचा कसोटीमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वातील सलग चौथा पराभव ठरला. फेब्रुवारी 2020 पासून म्हणजेच गेल्या वर्षभरात टीम इंडिया विराटच्या नेतृत्वात एकूण 4 कसोटी सामने खेळली आहे. या 4 ही सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. भारताला 2 वेळा न्यूझीलंड तर प्रत्येकी 1 वेळा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून पराभूत व्हाव लागलं आहे.

इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमधील दुसरी कसोटी चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये 13 ते 17 फेब्रुवारीदरम्यान खेळण्यात येणार आहे. या सामन्यात जोरदार पुनरागमन करण्याचा मानस टीम इंडियाचा असणार आहे. या दुसऱ्या सामन्यात स्टेडियममध्ये प्रेक्षकांना उपस्थित राहून मॅचचा आनंद घेता येणार आहे. एकूण क्षमतेच्या 50 टक्के चाहत्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहता येणार आहे.

संबंधित बातम्या :

India vs England 1st Test | इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव, त्यानंतरही कॅप्टन कोहलीचा ‘विराट’ विक्रम

India vs England : चेन्नई कसोटीत टीम इंडियाचे ‘हे’ 5 शिलेदार ठरले खलनायक!

India vs England 1st Test | इंग्लंडचा भारतावर शानदार विजय, टीम इंडियाच्या पराभवाची 5 प्रमुख कारणं

(india vs england 1st test 5th day virat kohli broke Clive Lloyd record for most test runs as captain)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें