AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NED T20 WC 2022: रोहित, विराट, सूर्याची तुफान बॅटिंग, नेदरलँडच्या गोलंदाजांना धुतलं

IND vs NED T20 WC 2022: जाणून घ्या टीम इंडियाने नेदरलँडला विजयासाठी किती धावांचं लक्ष्य दिलं?

IND vs NED T20 WC 2022: रोहित, विराट, सूर्याची तुफान बॅटिंग, नेदरलँडच्या गोलंदाजांना धुतलं
virat-suryaImage Credit source: PTI
| Updated on: Oct 27, 2022 | 2:15 PM
Share

सिडनी: टीम इंडियाचा सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर टी 20 वर्ल्ड कपमधला दुसरा सामना सुरु आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. तिसऱ्या ओव्हरमध्ये केएल राहुलच्या रुपाने टीम इंडियाला पहिला झटका बसला. राहुल 9 धावांवर LBW बाद झाला. त्यावेळी भारताच्या 11 धावा झाल्या होत्या.

रोहितने किती सिक्स मारले?

त्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहलीने डाव सावरला. सुरुवातीला दोघांनी सावध फलंदाजी केली. रोहित आज कॅप्टन इनिंग खेळला. त्याने 39 चेंडूत 53 धावा फटकावल्या. यात 4 चौकार आणि 3 षटकार होते. हाफ सेंच्युरी झळकावल्यानंतर वेगाने धावा बनवण्याच्या प्रयत्नात रोहित आऊट झाला. विराट-रोहितने दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली.

सूर्याची आक्रमक बॅटिंग

त्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला. सूर्याने आपल्या नेहमीच्या स्टाइलमध्ये फलंदाजी सुरु केली. त्याने चौफेर फटकेबाजी केली. सूर्याने आजच्या सामन्यात 25 चेंडूत  नाबाद 51 धावा केल्या. यात 7 चौकार आणि 1 षटकार लगावला.

विराटची दुसरी हाफ सेंच्युरी

विराट कोहलीने आज टी 20 वर्ल्ड कपमधील सलग दुसरं अर्धशतक झळकावलं. त्याने सुद्धा चौफेर फटकेबाजी करुन धावा वसूल केल्या. 44 चेंडूत नाबाद 62 धावा केल्या. यात 3 चौकार आणि 2 षटकार लगावले. टीम इंडियाने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 2 बाद 179 धावा केल्या. टीम इंडियाने नेदरलँडला विजयासाठी 180  धावांचे लक्ष्य दिले आहे.

भारताची प्लेइंग इलेवन

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह

Follow Us
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुळे म्हणाल्या?
Supriya Sule : शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; राऊतांचं मोठं राजकीय भाकीत
Sanjay Raut : देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; संजय राऊतांचं मोठं राजकीय भाकीत, नेमकं काय म्हणाले?
यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
Sanjay Raut on Dasara Melava : यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश.....
Actor Imran Khan : अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे निर्देश?
सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; कोणत्या गोष्टींवर....
Sunil Tatkare | सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; नेमक्या कोणत्या गोष्टींवर झाली चर्चा?
अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला...
Anganwadi Sevika Bhaubeej Gift : अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला मिळणार एवढे पैसे
पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी....
Shivsena : पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी; नेमकं काय घडतंय? 
तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं
Yo Yo Honey Singh : तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं समन्स; पुढे काय होणार?
काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; मंदिर व्यवस्थापनाने....
Kashi Vishwanath Temple : काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; वकिलांचा गंभीर आरोप, मंदिर व्यवस्थापनाने काय दिलं उत्तर?
मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
Mumbai FDA : मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई