IND vs NZ 2nd T20: रोक सको तो रोक लो, सूर्यकुमारचा झंझावात, 11 फोर, 7 SIX, VIDEO

IND vs NZ 2nd T20: सूर्यकुमारसमोर आज न्यूझीलंडचे गोलंदाज अक्षरक्ष: हतबल झाले.

IND vs NZ 2nd T20: रोक सको तो रोक लो, सूर्यकुमारचा झंझावात, 11 फोर, 7 SIX, VIDEO
Suryakumar yadav
Image Credit source: prime video
| Updated on: Nov 20, 2022 | 2:32 PM

माऊंट माऊंगानुई: सूर्यकुमार यादव सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. आज माऊंट माऊंगानुईच्या बे ओव्हल मैदानावर सूर्यकुमारने जबरदस्त बॅटिंग केली. सहज फलंदाजी करताना त्याने मैदानाच्या चारही दिशांना फटकेबाजी केली. कव्हर, थर्डमॅन, फाइन लेगला सूर्याच्या बॅटमधून क्लासिक फटके पहायला मिळाले. आज बे ओव्हलवर सूर्याची बॅटिंग पाहण क्रिकेट रसिकांसाठी एक मेजवानी होती.

न्यूझीलंडचे गोलंदाज अक्षरक्ष: हतबल

सूर्याच्या फलंदाजीमुळेच टीम इंडियाला न्यूझीलंडसमोर विजयासाठी 192 धावांच लक्ष्य उभारता आलं. सूर्यकुमार यादवने 51 चेंडूत नाबाद 111 धावा फटकावल्या. यात 11 चौकार आणि 7 षटकार आहेत. सूर्यकुमारच्या वादळासमोर आज न्यूझीलंडचे गोलंदाज अक्षरक्ष: हतबल दिसले.

बॅटिंगमध्ये तोच जलवा

सूर्यकुमार टी 20 वर्ल्ड कपपासून तुफान फॉर्ममध्ये आहे. आज सुद्धा त्याच्या बॅटिंगमध्ये तोच जलवा पहायला मिळाला. टी 20 क्रिकेटला साजेशी फलंदाजी करताना त्याने वेगाने धावा जमवल्या. सूर्यकुमार यादवच टी 20 मधील हे दुसरं शतक आहे.

100 चौकारही पूर्ण केले

याआधी इंग्लंड विरुद्ध त्याने नॉटिंघम येथे शतकी खेळी साकारली होती. टी 20 मध्ये एकावर्षात दोन शतकं झळकावणारा सूर्यकुमार दुसरा फलंदाज आहे. त्याच्याआधी रोहित शर्माने 2018 मध्ये हा कारनामा केला होता. आजच्या सामन्यात सूर्याने टी 20 क्रिकेटमध्ये आपले 100 चौकारही पूर्ण केले.