AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Pakistan T20 World Cup Result: पाकिस्तानकडून टीम इंडियाचा दारुण पराभव, ओपनर्सनी सामना जिंकला, भारतीय बॅटींगची दाणादाण

टी20 विश्वचषकाच्या भारताच्या पहिल्या सामन्यात भारताने अतिशय खराब कामगिरी केली आहे. भारताचा कर्णधार विराट आणि पंत सोडता इतर फलंदाज चांगली कामगिरी करण्यात अपयशी झाले. ज्यानंतर भारताचे गोलंदाजही अपयशी ठरल्याने पाकिस्तान विजयी झाला आहे.

India vs Pakistan T20 World Cup Result: पाकिस्तानकडून टीम इंडियाचा दारुण पराभव, ओपनर्सनी सामना जिंकला, भारतीय बॅटींगची दाणादाण
पाकिस्तान संघाची दमदार फलंदाजी
| Edited By: | Updated on: Oct 24, 2021 | 11:07 PM
Share

T20 World Cup 2021 : टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) सर्वात बहुप्रतिक्षित सामना असणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांची अखेर सांगता झाली आहे. उत्कृष्ट खेळाचं दर्शन घडवत पाकिस्तान संघाने 10 विकेट्सनी दमदार विजय मिळवला आहे. यामुळे भारतीय संघाची विश्वचषकातील सुरुवातच अतिशय खराब झाली आहे.

अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात सुरुवातीलाच खराब सुरुवात आणि सुमार फलंदाजीमुळे भारतीय संघ पराभूत झाला. आधी खराब फलंदाजीमुळे केवळ 151 धावा भारताने केल्या. ज्यानंतर पाकिस्तान संघाने अप्रतिम अशी फलंदाजी करत सामना 10 विकेट्सने खिशात घातला. विशेष म्हणजे पाकच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतकं ठोकली.

भारताची अत्यंत सुमार फलंदाजी

सर्वात आधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकली त्यामुळे जिंकणारा संघ निवडेल अशी गोलंदाजीच त्यांनी निवडली. ज्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात आले. यामध्ये फलंदाजीची सर्वाधिक मदार असलेल्या सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी अवघे 0 आणि 3 रन केले. संपूर्ण सामन्यात विराट आणि ऋषभने केवळ झुंज दिली. यात कोहलीने 57 आणि पंतने 39 धावा केल्या. त्यानंतर कोणालाच खास कामगिरी करत आल्याने संपूर्ण संघाचा डाव 151 धावांवर 20 ओव्हरमध्ये आटोपला.

पाकिस्तानचा दमदार विजय

152 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानने सुरुवातीपासूनच फलंदाजीमध्ये एक वेगळाच क्लास दाखवला. दोन्ही सलामीवीर बाबर आजम आणि रिजवान यांनी उत्कृष्ट अर्धशतक झळकावली. बाबरने 52 चेंडूत 68 धावा केल्या. तर रिजवानने 55 चेंडूत 79 धावा केल्या. भारताच्या एकाही गोलंदाजाला खास तर नाही किमान सुमार गोलंदाजीही करता आली नाही. एकही विकेट न घेता आल्याने भारताचा 10 विकेट्सनी लाजिरवाणा पराभव झाला आहे.

हे ही वाचा :

पाकिस्तानचा आफ्रिदी भारताला खतरनाक नडला, दोन्ही सलामीवीरांना घातक ठरला, रोहित पायचित, तर राहुलचा त्रिफळा

एकामागेएक सलामीवर माघारी परतले, सुरुवात गंडली, पण विराट लढला, एकेरी कमान सांभळत पाकिस्तानच्या गोलंदाजांना भिडला

रोहित भाईची फलंदाजी पाहून घाबरलो, गोलंदाजी करण्याची हिंमत होत नव्हती; स्टार पाकिस्तानी गोलंदाजाची कबूली

(India vs Pakistan T20 world cup Match Result 2021 Know Who T20 world cup Match Highlights)

Follow Us
उमेदवारी मागे घेताच काँग्रेसचा दणका! दोन उमेदवारांची थेट हकालपट्टी
Congress | उमेदवारी मागे घेताच काँग्रेसचा दणका! दोन उमेदवारांची थेट हकालपट्टी, राजकीय वर्तुळात खळबळ
सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील 34 कुटुंबांना 3.40 कोटींची मदत
Maratha Reservation | मनोज जरांगेंच्या उपोषणानंतर सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील 34 कुटुंबांना 3.40 कोटींची मदत मंजूर
बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील?
Uday Samant | बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील, उदय सामंतांचा विश्वास
तलवारींचा धाक, कारची तोडफोड; राजगड परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत
Pune | तलवारींचा धाक, कारची तोडफोड; राजगड परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
Sunil Tatkare | दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना देसाईंचं प्रत्युत्तर
Shambhuraj Desai | विधान परिषद निवडणूक: महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर, हवेतल्या गप्पा नको....
रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
Jalgaon Banana Loss | रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या.....
Chhatrapati Sambhajinagar | महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या रुपयांनी स्वस्त, आकडा जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा
कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले.....
Sanjay Raut UNCUT | कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले धक्कादायक दावे
तर मी राजकारणातून संन्यास घेईन; मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
Bal Mane | तर मी राजकारणातून संन्यास घेईन; बाळ मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ