AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs SA: दक्षिण आफ्रिकेच्या जखमेवर मीठ चोळत मयांकची अर्धशतकांची ‘हॅट्रिक’

ढगाळ वातावरण, खेळपट्टीवर चेंडूला मिळणारी उसळी आणि समोर रबाडा, लुंगी निगीडीसारखे भेदक गोलंदाज. कुठल्याही फलंदाजासाठी या आव्हानांचा सामना करण सोप नाहीय.

Ind vs SA: दक्षिण आफ्रिकेच्या जखमेवर मीठ चोळत मयांकची अर्धशतकांची ‘हॅट्रिक’
| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 5:11 PM
Share

सेंच्युरियन: ढगाळ वातावरण, खेळपट्टीवर चेंडूला मिळणारी उसळी आणि समोर रबाडा, लुंगी निगीडीसारखे भेदक गोलंदाज. कुठल्याही फलंदाजासाठी या आव्हानांचा सामना करण सोप नाहीय. पण भारताचा सलामीवीर मयांक अग्रवाल (Mayank agarwal) अत्यंत सहजतेने या परिस्थितीला सामोरा गेला व सेंच्युरियन कसोटीच्या पहिला डावात अर्धशतक झळकावलं. मयांकने 89 चेंडूंचा सामना करत करीअरमधील सहावे अर्धशतक झळकावले. या हाफ-सेंच्युरीच्या खेळीत त्याने शानदार आठ चौकारही लगावले.

मयांकचे हे अर्धशतक दक्षिण आफ्रिकन संघाला चांगलचं झोंबल असेल, कारण तो 36 धावांवर खेळत असताना विकेटकिपर क्विंटन डिकॉकने मयांकचा सोपा झेल सोडला. मार्को जॅनसेनच्या सुंदर आऊट स्विंगने मयांकच्या बॅटची कड घेतली होती. पण डिकॉकला हा झेल पकडता आला नाही. मयांकने या संधीचा फायदा उचलत चौकार ठोकून अर्धशतक झळकावले.

मयंक अग्रवालची ‘हॅट्रिक’ मयांकने अर्धशतक झळकावत आपला फॉर्म कायम राखला आहे. त्याने सलग तीन कसोटी डावात 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मयांकने न्यूझीलंड विरुद्ध मुंबई कसोटीत 150 धावांची शतकी आणि 62 धावांची अर्धशतकी खेळी साकारली होती.

मयांकसाठी अर्धशतक खास मयांक अग्रवालसाठी सेंच्युरियनमधलं हे अर्धशतक खास आहे. कारण मयांकने आजच्याच दिवशी 2018 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटीमध्ये पदार्पण केले होते. परदेशातील खेलपट्ट्यांवर मयांकच्या बॅटमधून धावा आटतात. त्यामुळेच हे अर्धशतक त्याच्यासाठी खास आहे. मयांकला इंग्लंड-ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी मिळाली होती. पण त्यावेळी त्याला प्रभावी कामगिरी करता आली नव्हती. आज मात्र मयांकने निर्धाराने फलंदाजी केली.

Follow Us
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात