AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA, 2nd ODI: पुण्याचा ऋतुराज, मुंबईचा सूर्यकुमार वेटिंगवरच, राहुलने कायम ठेवला तोच संघ

भारताचा कॅप्टन केएल राहुलने (KL Rahul) नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

IND vs SA, 2nd ODI: पुण्याचा ऋतुराज, मुंबईचा सूर्यकुमार वेटिंगवरच, राहुलने कायम ठेवला तोच संघ
ऋतुराज गायकवाड
| Edited By: | Updated on: Jan 21, 2022 | 2:29 PM
Share

पार्ल: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (India vs South Africa) दुसरा वनडे सामना बोलँड पार्कच्या मैदानावर सुरु झाला आहे. भारताचा कॅप्टन केएल राहुलने (KL Rahul) नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या प्लेइंग इलेवनमध्ये कोणताही बदल झालेला नाही. महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला (Ruturaj gaikwad) आणि मुंबईच्या सूर्यकुमार यादवला संधी मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण संघात कोणताही बदल झालेला नाही. वेंकटेश अय्यरचा ऑलराऊंडर म्हणून संघात समावेश झाला आहे.

वेंकटेश अय्यरला बॉलिंग द्यायची नसेल, तर…. वेंकटेश अय्यरला गोलंदाजी देणार की, नाही, याबद्दल स्पष्टत नाहीय. मागच्या सामन्यात टेंबा बावुमा आणि डुसेची जोडी प्रमुख गोलंदाजांना फोडता आली नाही. त्यावेळी वेंकटेश अय्यरकडे चेंडू सोपवायला हवा होता. पण त्याला गोलंदाजी दिली नाही. त्याबद्दल कॅप्टन राहुलवर बरीच टीका झाली. वेंकटेश अय्यरला बॉलिंग द्यायची नसेल, तर त्याच्याजागी ऋतुराज गायकवाड या स्पेशलिस्ट फलंदाजाला संधी दिली पाहिजे, असं अनेक क्रिकेट पंडितांच मत होतं.

पण दुसऱ्या वनडेत तोच संघ कायम ठेवण्यात आला आहे. पाचव्या स्थानावर श्रेयस अय्यर ऐवजी सूर्यकुमारला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. दोघेही मुंबईचेच आहेत. पण श्रेयस अय्यरला पुन्हा एक चान्स देण्यात आला आहे. ऋतुराज गायकवाड आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी स्थानिक क्रिकेट स्पर्धेमध्ये खोऱ्याने धावा केल्या आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यात स्वत:ची उपयुक्तता सिद्ध करण्याची त्यांना एकतरी संधी मिळाली पाहिजे.

India vs south Africa 2nd ODI paarl boland park Pune Ruturaj gaikwad Mumbai Suryakumar yadav still not part of playing eleven

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.