IND vs SA | दक्षिण आफ्रिका-टीम इंडिया दुसऱ्या कसोटीत पावसाची एन्ट्री? हवामान कसं असणार?

South Africa vs India 2nd Test Weather Report | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिल्या सामन्यात पावसाने काही वेळ हजेरी लावली होती. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यातही पाऊस विघ्न घालणार का, जाणून घ्या वेदर रिपोर्ट.

IND vs SA | दक्षिण आफ्रिका-टीम इंडिया दुसऱ्या कसोटीत पावसाची एन्ट्री? हवामान कसं असणार?
| Updated on: Jan 02, 2024 | 10:29 PM

केपटाऊन | पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिके विरुद्ध दुसरा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. दुसरा आणि अंतिम सामना हा 3 जानेवारीपासून केपटाऊनमधील न्यूलँड्समध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाला पहिल्या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेकडून 1 डाव आणि 32 धावांनी पराभूत व्हावं लागलं. या दुसऱ्या सामन्यात हवामान कसं असेल, हे आपण जाणून घेऊयात.

टीम इंडियाची केपटाऊमधील कामगिरी

टीम इंडियाला आतापर्यंत केपटाऊनमध्ये एकही कसोटी सामना जिंकू शकलेली नाही. टीम इंडिया केपटाऊनमध्ये 1993 पासून ते आतापर्यंत 6 सामने खेळली आहे. टीम इंडियाला या 6 सामन्यांपैकी 4 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. तर टीम इंडियाने 2 सामने ड्रॉ केले आहेत.

हवामान कसं असेल?

केपटाऊनमध्ये दिवसभर उन असेल. सामन्याच्या सुरुवातीला पावसाची काडीमात्र शक्यता नाही. पहिल्या दिवशी तापमान 20 ते 28 अंश सेल्सियस इतकं असेल.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण 43 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये काही प्रमाणात दक्षिण आफ्रिका सरस ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेने 43 पैकी 18 सामने जिंकले आहेत. तर टीम इंडियाला 15 सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर 10 सामने अनिर्णित राहिले आहेत.

दुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज

टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अभिमन्यु ईश्वरन, रवीचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), शार्दूल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, आवेश खान आणि प्रसिद्ध कृष्णा.

दक्षिण आफ्रिका टीम | टेम्बा बावुमा (कर्णधार), डेविड बेडिंघम, नांद्रे बर्गर, एडेन मार्करम, वियान मुल्डर, कगिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन, गेराल्ड कोएट्जी, टोनी डी जोर्जी, डीन एल्गर, मार्को यानसेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी आणि कीगन पीटरसन.