AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: अजिंक्य-चेतेश्वरला ALL THE BEST, दोघांसाठी आज ‘करो या मरो’

दोघांवर प्रचंड दबाव आहे, यात अजिबात शंका नाही. पण अशाच परिस्थितीत त्यांनी स्वत:च नाण खणखणीत वाजवून दाखवलं, तर टीका करणारेच आज त्यांना डोक्यावर घेतील.

IND vs SA: अजिंक्य-चेतेश्वरला ALL THE BEST, दोघांसाठी आज 'करो या मरो'
Ajinkya Rahane
| Edited By: | Updated on: Jan 05, 2022 | 7:00 AM
Share

जोहान्सबर्ग: पालघरच्या शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) काल आपलं काम चोख बजावलं. सात विकेट घेऊन त्याने दक्षिण आफ्रिकेचं कंबरड मोडून काढलं. त्याच्या परफॉरमन्समुळेच दक्षिण आफ्रिकेला मोठी आघाडी घेता आली नाही. संघाला गरज असताना शार्दुलने खेळपट्टीवर जमलेल्या जोड्या फोडल्या व विकेट मिळवून दिले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 229 धावात आटोपला. भारताचा भेदक गोलंदाज मोहम्मद सिराज दुखापतीमुळे फार षटके गोलंदाजी टाकू शकत नव्हता. त्यावेळी बुमराह, शामीच्या साथीने शार्दुलने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली व चोख काम केलं. (India vs South Africa johannesburg Test Ajinkya Rahane & cheteshwar pujara now final chance to perform)

गोलंदाजांमुळे आव्हान टिकून 

आता हा कसोटी सामना कुठल्या दिशेने जाणार ते सर्वस्वी फलंदाजांवर अवलंबून आहे. काल गोलंदाजांची परीक्षा होती. आज फलंदाजांची परीक्षा आहे. पहिला कसोटी सामना असो किंवा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव गोलंदाजांमुळेच जोहान्सबर्ग कसोटीत भारताचं आव्हान टिकून आहे. पहिल्या डावातील अपयशामुळे अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराचे टेस्ट करीअर संपणार अशा चर्चा आहेत. कारण दोघांना बऱ्यात संधी देऊनही त्यांनी अपेक्षित कामगिरी केलेली नाही.

टीकाकारांची तोंड बंद करण्याची कदाचित शेवटची संधी

आज टीकाकारांची तोंड बंद करण्याची कदाचित शेवटची संधी त्यांच्याकडे असू शकते. आज दोघांनी लौकीकाला साजेशी कामगिरी करुन भारताला सुस्थितीत पोहोचवलं, तर पुन्हा हिरो होण्याची संधी आहे. दोघांवर प्रचंड दबाव आहे, यात अजिबात शंका नाही. पण अशाच परिस्थितीत त्यांनी स्वत:च नाण खणखणीत वाजवून दाखवलं, तर टीका करणारेच आज त्यांना डोक्यावर घेतील. काल सुरुवात तर चांगली झाली आहे. फक्त आता त्यांना सातत्य दाखवावं लागेल. त्या दोघांवरच नव्हे, तर ऋषभ पंत, हनुमा विहारी, अश्विन, शार्दुल यांनाही आपली भूमिका चोख बजावावी लागेल. भारताला दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच ऐतिहासिक कसोटी मालिका विजयाची संधी आहे.

संबंधित बातम्या: 

IND vs SA: ‘लॉर्ड’ शार्दुल ठाकूर सोशल मीडियावर हिरो, पाहा एकापेक्षा एक भन्नाट ‘मीम्स’ Shardul Thakur: तू आहेस तरी कोण? स्टंम्पवरच्या मायक्रोफोनमुळे अश्विनने विचारलेला प्रश्न जगाला कळला Shardul Thakur: शार्दुल लोकप्रिय, यशस्वी का? ट्रेन करणाऱ्या कोचने सांगितलं त्यामागचं कारण…

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली