
मुंबई : भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या सामन्यामध्ये आज मंगळवारी भारताचा डाव गडगडला. तरण्या पोराने भारताच्या बॅटींग लाईनअपला सुरूंग लावला. पठ्ठ्याने रोहित शर्मा बोल्ड, शुबमनल गिल बोल्ड, विराट कोहली कॅच, के. एल. राहुल कॅच आऊट आणि हार्दिक पंड्या या दर्जेदार खेळाडूंना त्याने पव्हेलिअनचा रस्ता दाखवला. भारताचा डाव 213 धावांवर आटोपला, श्रीलंकेचा युवा गोलंदाज वय वर्षे 20 असलेल्या दुनिथ वेललागे याने सुरूंग लावला. भारताची अवस्था 80-0 अशी होती मात्र इथून जी घसरगुंडी झाली ती 91-3 अशी झाली. हा 20 वर्षाचा दुनिथ वेललागे नेमका आहे तरी कोण? जाणून घ्या.
20 वर्षाचा हा दुनिथ वेललागे याने 2022 साली वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आतापर्यंत त्याने 12 सामने खेळले असून त्यामध्ये त्याने 13 विकेट घेतल्या असून त्याने 145 धावा बनवल्या आहेत. यामध्ये धावांमध्ये 33 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. टी-20 क्रिकेटमध्ये 27 सामने खेळताना त्याने 22 विकेट घेतल्यात.
Dunith Wellalage, The hero of Sri Lanka.
He gets Rohit, Gill, Kohli, Rahul – A Superstar in making. pic.twitter.com/GdgWRNktmq
— Johns. (@CricCrazyJohns) September 12, 2023
भारत-श्रीलंका सामन्याला सुरूवात झाली तेव्हा सलामीला शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांनी मजबूत सुरूवात केली होती. रोहित शर्मा तर फटाके फोडल्यासारखे बॅटींग करत होता, पठ्ठ्याने सामन्याला सुरूवात होताच आपलं अर्धशतक करत 10,000 धावांचा टप्पा पूर्ण केला. भारताचं सामन्यावर पूर्ण वर्चस्व होतं मात्र दुनिथ वेललागे आला आणि ग्रह फिरल्यासारखे भारतीय संघाची अवस्था झाली.
दरम्यान, दुनिथ वेललागेने संपूर्ण सामन्याचं चित्रच पालटून टाकलं होतं. कारण भारत दबावामध्ये गेला होता, के. एल. राहुल, ईशान किशन आणि अक्षर पटेल यांनी केलेल्या धावांमुळे भारताने 200 धावांचा टप्पा पार केला.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.