AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: रोहित शर्माचा एका हाताने मारलेला षटकार पाहून गावस्कर म्हणाले….पहा VIDEO

IND vs WI भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये (India vs West indies) इडन गार्डन्सवर दुसरा टी 20 सामना (T 20 Match) सुरु आहे. आज प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताच्या डावात अजब-गजब षटकार पहायला मिळाला.

IND vs WI: रोहित शर्माचा एका हाताने मारलेला षटकार पाहून गावस्कर म्हणाले....पहा VIDEO
| Updated on: Feb 18, 2022 | 9:50 PM
Share

कोलकाता: भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये (India vs West indies) इडन गार्डन्सवर दुसरा टी 20 सामना (T 20 Match) सुरु आहे. आज प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताच्या डावात अजब-गजब षटकार पहायला मिळाला. कॅप्टन रोहित शर्माने (Rohit sharma) एकाहाताने षटकार लगावला. रोमारीयो शेपहर्ड गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेल्या चेंडूवर रोहितला खरंतर वेगळा फटका खेळायचा होता. पण चेंडू उशिराने बॅटवर आला व पॉईंटच्या डोक्यावरुन षटकार गेला. रोहितनेही असा कुठला फटका ठरवला नव्हता. पण चेंडूचा वेगच इतका होता की, बॅटच्या एजला लागून तो एकाहाताने मारलेला षटकार ठरला. भारताने प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजला विजयसाठी 187 धावांच लक्ष्य दिलं आहे. भारताकडून विराट कोहली आणि ऋषभ पंतने अर्धशतक झळकवली.

हा षटकार पाहून कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेले सुनील गावस्कर म्हणाले की, अशा फटक्याचा आनंद घ्यायचा असतो, विश्लेषण करायचं नसतं. हेच योग्य विश्लेषण ठरेल. कारण काही वर्षांपूर्वी क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या सिक्सचा कोणी विचारही केला नसेल. क्रिकेट इतकं बदललय की, क्रिकेटमधले नेहमीच्या फटक्यांच तितक महत्त्व उरलेलं नाहीय. पद्धत कुठली ते महत्त्वाचं नाही. धावा येण जास्त महत्त्वाचं आहे.

भारताने आजच्या दुसऱ्या टी 20 सामन्यासाठी संघात कुठलाही बदल केलेला नाही. वेस्ट इंडिजने फॅबियन एलेनच्या जागी जेसन होल्डरचा संघात समावेश केला आहे.

India vs West indies 2 nd T 20 match rohit sharma one handed six sunil gavaskar reaction

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.