AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिताली पाठोपाठ ‘या’ महिला भारतीय गोलंदाचाही विश्वविक्रम, तब्बल 2000 हून अधिक ओव्हर टाकणारी पहिली महिला गोलंदाज

भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करत विश्वविक्रम रचला. तिच्यासोबतच वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने देखील एक विक्रम करत जागतिक महिला क्रिकेटमध्ये कोणत्याही गोलंदाजाला न करता आलेली कामगिरी केली आहे.

मिताली पाठोपाठ 'या' महिला भारतीय गोलंदाचाही विश्वविक्रम, तब्बल 2000 हून अधिक ओव्हर टाकणारी पहिली महिला गोलंदाज
झुलन गोस्वामी
| Edited By: | Updated on: Jul 04, 2021 | 4:14 PM
Share

मुंबई : भारतीय पुरुष संघाप्रमाणे महिला संघही सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. एकमेव कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर एकदिवसीय मालिकेतही इंग्लंडच्या संघाने जिंकली. मात्र अखेरच्या सामन्यात भारताने अप्रतिम विजय मिळवत 3 पैकी 1 सामना मात्र आपल्या नावे केला. भारतासाठी हा विजय खास ठरला कारण या सामन्यातच भारताच्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी जागतिक विक्रम केला. एकीकडे कर्णधार मिताली राजने सामन्यात केलेल्या 75 धावांमुळे (Mithali Raj) आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये 10 हजार 337 धावांचा टप्पा पार केला आणि सर्वाधिक धावा करणारी महिला खेळाडू ठरली. तर दुसरीकडे दिग्गज गोलंदाज झुलन गोस्वामीने (Jhulan Goswami) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 हून अधिक ओव्हर्स टाकत विश्वविक्रम केला आहे. (Indian Women Fast Bowler Jhulan Goswami Became First Ever Woman to Bowl 2000 Overs in International Cricket)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने पहिली गोलंदाजी घेतली. यावेळी भारतीय महिलांनी इंग्लंडला 219 धावांत ऑलआऊट केले. ज्यात झुलनने 9 ओव्हर टाकत एक विकेटही पटकावला आणि या ९ ओव्हर्ससह तिने एकदिवसीय सामन्यात 1500 ओव्हर्सचा टप्पा पार केला. यासोबतच टेस्ट सामन्यांत झुलनने 349 आणि टी-20 सामन्यांत 225 ओव्हर्स टाकत एकूण 2000 ओव्हर्सचा टप्पा पार केल आहे. अशी कामगिरी कऱणारी ती एकमेव महिला गोलंदाज आहे.

झुलनचं क्रिकेट करिअर

महिला क्रिकेटमधील सर्वांत महान गोलंदाज झुलन गोस्वामीने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 19 वर्ष पूर्ण केलेल्या झुलन गोस्वामीने महिला क्रिकेटमध्ये 300 पेक्षा अधिक विकेट मिळवणारी जगातील एक मात्र गोलंदाज आहे. झुलनने आपल्या इंटरनॅशनल क्रिकेट करियर मध्ये 333 विकेट घेतल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 पेक्षा जास्त विकेट घेणारी झुलन जगातील एकमेव गोलंदाज आहे. तिने 180 एकदिवसीय क्रिकेट मॅचेसमध्ये 236 विकेट घेतल्या आहेत तर 11 कसोटी सामन्यात तिने 41 महिला फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. 68 टी ट्वेंटी सामन्यात 56 विकेट तिच्या नावावर आहेत.

झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये अनुष्का शर्मा

झुलन गोस्वामी भारतीय महिला क्रिकेटसह जागतिक क्रिकेट जगतातील एक मोठं नाव आहे. त्यामुळे तिच्या आयुष्यावर एक सिनेमा येतोय. विशेष म्हणजे झुलनच्या बायोपिकमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) प्रमुख भूमिका साकारणार आहे. सध्या विराटबरोबर इंग्लंडमध्ये लेक वामिकासोबत असणारी अनुष्का गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटापासून दूर आहे. शाहरुख खानबरोबर ‘जीरो’ चित्रपटानंतर ती मोठ्या पडद्यावर दिसली नाही. आता लवकरच प्रेक्षकांची ओढ संपणार आहे. झुलनच्या बायोपिकमध्ये अनुष्का शर्मा प्रमुख भूमिका साकारणार आहे.

हे ही वाचा :

मिताली राजचा भीमपराक्रम, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधील यशाचे शिखर गाठत तेंडुलकरच्या पंगतीत मिळवले स्थान

झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये अनुष्का शर्मा साकारणार प्रमुख भूमिका, निळ्या जर्सीमधला फोटो व्हायरल

Video : इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात स्मृतीने झेप घेत टिपला अप्रतिम झेल, व्हिडीओ पाहून क्रिकेटप्रेमी खुश

(Indian Women Fast Bowler Jhulan Goswami Became First Ever Woman to Bowl 2000 Overs in International Cricket)

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?