AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात स्मृतीने झेप घेत टिपला अप्रतिम झेल, व्हिडीओ पाहून क्रिकेटप्रेमी खुश

भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना तिच्या धडाकेबाज क्रिकेटसोबतच क्यूट लूक्ससाठी कायम चर्चेत असते. तिचे अनेक फोटो चाहत्यांकडून व्हायरल केले जातात. दरम्यान आता तिचा एक अप्रतिम झेल टिपतानाता व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Video : इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात स्मृतीने झेप घेत टिपला अप्रतिम झेल, व्हिडीओ पाहून क्रिकेटप्रेमी खुश
Smriti Mandhana catch
| Edited By: | Updated on: Jul 04, 2021 | 11:40 AM
Share

लंडन : भारतीय महिला क्रिकेटपटू सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहेत. एकमेव टेस्ट अनिर्णीत राहिल्यानंतर नुकतील एकदिवसीय मालिका ही संपली पहिले दोन सामने जिंकलेल्या इंग्लंडने मालिका आधीच आपल्या खिशात घातली होती. मात्र अखेरच्या सामन्यात कर्णधार मिताली राज (Mithali Raj) आणि  स्मृती मंधानाच्या (Smriti Mandhana) उत्कृष्ठ खेळीवर भारताने विजय मिळवला. स्मृतीने फलंदाजीत योगदाना बरोबरच क्षेत्ररक्षणातही दमदार कामगिरी केली. तिने बाऊन्ड्री लाईनवर पकडलेल्या एका अप्रतिम कॅचचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (Indian Women vs England Women Third one day Won By India in match Smriti Mandhana Garbs Stunning Diving Catch Video Went Viral)

इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजी करत असताना फलंदाज सिवर चांगल्या लयीत खेळताना दिसत होती. दरम्यान दीप्ति शर्मा 38 वी ओव्हर टाकत असताना 49 धावांवर खेळणाऱ्या सिवरने पुढे येऊन एक शॉट खेचला. चेंडू हवे उडाला आणि मिडविकेटच्या दिशेने गेला. त्याचवेळी स्मृतिने एक अप्रतिम झेप घेत सिवरने मारलेला चेंडू पकडला आणि सिवरला तंबूत धाडले. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

स्मृती आणि मिताली जोडीची विजयी खेळी

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरचा एकदिवसीय सामना सुरुवातीपासून भारताच्या पारड्यात होता. आधी भारतीय गोलंदाजानी उत्तम कामगिरी करत इंग्लंडला 219 धावांत ऑलआऊट केले. त्यानंतर भारताकडून सलामीला आलेल्या स्मृतीने कर्णधार मितालीसोबत उत्तम भागिदारी केली. अवघ्या एका धावेने स्मृती अर्धशतकापासून दूर राहिली. स्मृती बाद झाल्यानंतरही मितालीने टिकून राहत नाबाद 75 धावांच्या जोरावर भारताला विजय मिळवून दिला.

हे ही वाचा :

मिताली राजचा भीमपराक्रम, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधील यशाचे शिखर गाठत तेंडुलकरच्या पंगतीत मिळवले स्थान

स्मृती मंधानाला लग्नासाठी कसा मुलगा हवा?, चाहत्याच्या प्रश्नावर स्मृतीचं Cute उत्तर

मिताली राजचा अनोखा रेकॉर्ड, कोहली-रोहित शर्मासह अनेक दिग्गजांना टाकलं मागे, इंग्लंडमध्ये रचला इतिहास

(Indian Women vs England Women Third one day Won By India in match Smriti Mandhana Garbs Stunning Diving Catch Video Went Viral)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.