AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर पाणी अर्पण केल्यानंतर ‘हे’ काम करू नका, अन्यथा सुरू होईल वाईट काळ

शिवमंदिरात शिवलिंगाला जल अर्पण केल्यानंतर आणि रुद्राभिषेक केल्यानंतर घरी परतल्यावर काही गोष्टी करणे टाळावे. अन्यथा पूजा निष्फळ ठरू शकते. चला तर मग शिवलिंगावर जल अर्पण केल्यावर कोणती कामे करू नये त्याबद्दल जाणून घेऊयात.

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर पाणी अर्पण केल्यानंतर 'हे' काम करू नका, अन्यथा सुरू होईल वाईट काळ
| Edited By: | Updated on: Feb 27, 2026 | 11:16 AM
Share

दरवर्षी महाशिवरात्रीचा पवित्र सण फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. हा सण उद्या 15 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाईल. शिव आणि शक्तीच्या मिलनाचे स्मरण करण्यासाठी महाशिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी भाविक भक्त उपवास करतात आणि भगवान शिवाची विशेष पूजा करतात. शिवभक्तांसाठी हा सण खूप महत्वाचा असतो कारण या दिवशी शिवलिंगावर विविध अभिषेक करून पुजा पाठ स्तोत्र पठण केले जातात.

या दिवशी भाविक निर्जला उपवास करतात आणि कडक विधी करतात. शिवलिंगावर रुद्राभिषेकम देखील केले जाते. तथापि मंदिरात शिवलिंगाला जल अर्पण केल्यानंतर आणि रुद्राभिषेकम केल्यानंतर, घरी परतल्यावर काही गोष्टी करणे टाळल्या पाहिजेत. अन्यथा एखाद्या व्यक्तीला पापाचा दोष लागू शकतो आणि पूजा निष्फळ होऊ शकते. तर घरी परतल्यावर आणि शिवलिंगावर जल अर्पण केल्यानंतर कोणती गोष्ट करणे टाळावी हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

शिवलिंगाला पाणी अर्पण केल्यानंतर आणि मंदिरातून परतल्यानंतर या गोष्टी करू नका

शिवमंदिरात पाणी अर्पण केल्यानंतर कधीही रिकाम्या हाताने घरी परतू नका. तुम्ही जर शिवलिंगाला पाणी अर्पण करण्यासाठी एखादा तांब्या सोबत आणला असेल तर घरी परतण्यापूर्वी त्यात पाणी, चरणामृत, फळे, फुले किंवा इतर नैवेद्य ठेवा. असे न केल्यास पाप लागू शकते.

शिवमंदिरात पाणी अर्पण केल्यानंतर घरी परतताना किंवा वाटेत कुठेही हात किंवा पाय लगेच धुणे टाळा. असे केल्याने तुम्हाला नकारात्मक उर्जेच्या परिणामाला समोरे जावे लागू शकते.

घरी परतल्यावर मंदिरातून आणलेला प्रसाद लगेच खाऊ नका. किंवा वाटेत तो खाऊ नका. असे करणे शास्त्रात अशुभ मानले जाते. शिवाय प्रसाद अशुद्ध ठिकाणी ठेवू नका किंवा त्याचा अपमान करू नका.

मंदिरातून बाहेर पडताच चिडणे किंवा भांडणे टाळा. तसेच, नकारात्मक विचारांपासून दूर रहा.

मंदिरातून परतल्यानंतर लगेच झोपू नका. यामुळे कारण तुम्ही मंदिरातून पुजा करून आल्यानंतर तुमच्यासोबत असलेली सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि अडचणींवर मात करण्यास मदत होते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी