आम्ही निवडणुक आयोगाची ‘ती’ चूक समोर आणली, अपात्रतेबाबत… सुनावणीनंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया
शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या मालकी हक्कावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि कामत यांनी आज ठाकरे गटाची बाजू मांडली. यावेळी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अनेक कायदेशीर मुद्दे उपस्थित करण्यात आले.

सुनावणीनंतर ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, “आज कोर्टासमोर कपिल सिब्बल आणि कामतांनी आमची बाजू मांडली.” तसेच निवडणूक आयोगाकडून खूप मोठी चूक झाली होती आणि ती तेव्हाच सुधारण्याची गरज होती, असेही त्यांनी सांगितले.
आमदारांना अपात्र करणं गरजेचं होतं
अनिल देसाई म्हणाले, “आमदार जर त्यावेळी अपात्र झाले असते तर निवडणूक आयोगाचा पक्ष चिन्हाचा मुद्दा तेव्हाच निकाली निघाला असता.” त्यामुळे आमदारांना अपात्र न केल्याने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, “आजही एक तासाचा अवधि मिळाला. पुढे मंगळवारी किंवा बुधवारी आमचा युक्तीवाद सुरु राहील.” तसेच “आमचे सगळे युक्तीवाद रेकॉर्ड होत आहेत,” असेही त्यांनी सांगितले. 2018 ची पक्षाची घटना निवडणूक आयोगाला दिल्याचे त्यांनी नमूद केले.
Published on: Aug 06, 2026 05:57 PM
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... ठाकरेंच्या वकिलांच्या दाव्याने..
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही...
आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा