एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर… वकिलांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हाच्या मालकी हक्काच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर तीव्र आक्षेप
शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हाच्या मालकी हक्काच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत अनेक महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे न्यायालयासमोर मांडले. निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन निर्णय दिल्याचा दावा करत त्यांनी आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
याबाबत वकील असीम सरोदे यांनी मत मांडले आहे. त्यांनी सांगितले की, घटनेनुसार आणि १० व्या अनुसूचीनुसार आमदारांची तसेच एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर होती, असा दावा त्यांनी केला आहे. महत्त्वाचे म्हणजे कोर्टाने सुनावणी आता पुढच्या आठवड्यावर ढकलली आहे, मात्र कोर्टातील युक्तिवादांनी आणि वकिलांच्या दाव्यांनी खळबळ उडवून दिली आहे. याशिवाय वकील असीम सरोदे यांनी विविध मुद्दे मांडले असून पक्षांतर बंदी कायद्याबाबतही माहिती दिली आहे.
Published on: Aug 06, 2026 05:29 PM
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... ठाकरेंच्या वकिलांच्या दाव्याने..
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही...
आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा
अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं

