AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur | नागपूरच्या डॉक्टरचा सांगलीत अपघाती मृत्यू; रुग्णालयातून घरी जाताना काळाचा घाला

Nagpur | नागपूरच्या डॉक्टरचा सांगलीत अपघाती मृत्यू; रुग्णालयातून घरी जाताना काळाचा घाला

| Updated on: Aug 07, 2026 | 10:59 AM
Share

नागपूरमधून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. नागपूरच्या डॉक्टरचा सांगलीमध्ये झालेल्या भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डॉ. खुशी मुंदडा असे मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.

नागपूरमधून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. नागपूरच्या डॉक्टरचा सांगलीमध्ये झालेल्या भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डॉ. खुशी मुंदडा असे मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.

रुग्णालयातील काम आटोपून घरी जात असताना भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या आणि उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

डॉ. खुशी मुंदडा यांनी MBBSचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सांगलीतील भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडवण्याच्या वाटेवर असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

या भीषण अपघातामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. अपघात नेमका कसा झाला, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Published on: Aug 07, 2026 10:59 AM

Follow Us