मोठी बातमी! आधी वाचलास आता… NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो क्लीपने खळबळ
NCP नेत्याला पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. धमकीचा संदेश मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. तसेच झिशान सिद्दीकी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. धमकीचा संदेश मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. तसेच झिशान सिद्दीकी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील फरार आरोपी झिशान अख्तर याने व्हॉइस नोटद्वारे झिशान सिद्दीकी यांना धमकी दिल्याचा दावा केला जात आहे. या व्हॉइस नोटची सत्यता आणि त्यामागील व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास केला जात आहे.
दरम्यान, झिशान सिद्दीकी यांना धमकी देणारा कॉल आणि व्हॉइस नोट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. संबंधित ऑडिओची माहिती घेऊन पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेनंतर झिशान सिद्दीकी यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला असून, त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणात तपासातून पुढे काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Aug 06, 2026 06:30 PM
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
मूळ पक्षाला डावलून फुटीर गटाला चिन्ह; राऊतांचा निवडणूक आयोगावर निशाणा
DJचा आवाज कमी अन् शाडूच्या मूर्तींना पसंती; गणेशोत्सवातील बदलांवर...
'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर, रोहित पवारांची नाराजी

