AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या ब्रेकफास्ट बैठकीत काय घडलं? शिवसेनेच्या 7 फुटीर खासदारांना नेमक्या काय दिल्या सूचना?

मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या ब्रेकफास्ट बैठकीत काय घडलं? शिवसेनेच्या 7 फुटीर खासदारांना नेमक्या काय दिल्या सूचना?

| Updated on: Aug 07, 2026 | 11:50 AM
Share

मतदारसंघातील विकासकामांना गती द्या; सत्तेचा उपयोग करून जनतेची कामं मार्गी लावा, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या सात खासदारांना दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या सात खासदारांशी संवाद साधत त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी प्रत्येक खासदाराची स्वतंत्रपणे विचारपूस करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या ब्रेकफास्ट बैठकीतील इनसाइड माहिती टीव्ही9 मराठीच्या हाती लागली आहे. मतदारसंघात कोणतीही विकासकामे प्रलंबित असतील किंवा केंद्र सरकारशी संबंधित कामांसाठी अडचणी येत असतील, तर थेट पंतप्रधान कार्यालयाशी संवाद साधा, अशा सूचना मोदींनी खासदारांना दिल्याचे समजते.

या बैठकीत खासदारांच्या मतदारसंघातील विविध प्रश्न, विकासकामे आणि केंद्राच्या माध्यमातून मार्गी लावता येणाऱ्या कामांबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेत मोदींनी संबंधित खासदारांशी स्वतंत्र संवाद साधल्याचेही सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या या सूचनांमुळे शिवसेनेच्या खासदारांकडून आगामी काळात मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांना अधिक वेग देण्याची शक्यता आहे. दरम्यान, या बैठकीतील नेमक्या चर्चेची आणि मोदींनी खासदारांना दिलेल्या सूचनांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Published on: Aug 07, 2026 11:50 AM

Follow Us