AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नच नको, पुरुष सर्वकाही हिरावून घेतात..; 51 वर्षांची अमिषा पटेल असं का म्हणाली?

Ameesh Patel : 51 वर्षीय अमिषा पटेल आजही सिंगल आहे. एक्स अकाऊंटवर तिला एका चाहत्याने लग्नाबद्दल विचारलं असता त्यावर अमिषाने सडेतोड उत्तर दिलं आहे. ती नेमकं काय म्हणाली, ते वाचा..

लग्नच नको, पुरुष सर्वकाही हिरावून घेतात..; 51 वर्षांची अमिषा पटेल असं का म्हणाली?
Ameesha PatelImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 07, 2026 | 12:23 PM
Share

‘कहो ना प्यार है’ या पहिल्याच चित्रपटातून अभिनेत्री अमिषा पटेल लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. अभिनेता हृतिक रोशनसोबत तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटानंतर दोघांनाही असंख्य स्थळं येऊ लागली होती. एकीकडे हृतिकने त्याच वर्षी सुझान खानशी लग्न केलं होतं. तर दुसरीकडे अमिषा आज वयाच्या 51 व्या वर्षीही सिंगलच आहे. आता एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनदरम्यान अमिषाने तिच्या लग्नाबद्दल स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. या सेशनदरम्यान एका चाहत्याने तिला विचारलं, ‘तू लग्न कधी करणार आहेस?’ त्यावर ती म्हणाली, “कधीच नाही. मी एकटी खूप खुश आहे. माझे कुटुंबीय आणि अत्यंत जवळचा मित्रपरिवार असे 100 लोक माझ्या आयुष्यात आहेत, जे माझ्यावर खूप प्रेम करतात. त्यामुळे एका परक्या व्यक्तीने येऊन माझ्यापासून हे सर्व हिरावून घ्यावं किंवा बदलून टाकावं, हे मला अजिबात सहन होणार नाही.”

याआधी एका पॉडकास्टमध्ये अमिषाने तिचा एक अनुभव सांगितला होता. “जे तुमच्यावर खरंच प्रेम करतात, ते तुमच्या करिअरला पुढे घेऊन जातात. मी माझ्या करिअरसाठी आणि प्रेमासाठी खूप काही गमावलंय. मी दोन्ही गोष्टींचा एकमेकांसाठी त्याग केला आहे आणि आता त्यातूनच मी खूप काही शिकले आहे. चित्रपटसृष्टीत काम करण्यापूर्वी मी एका सीरियस रिलेशनशिपमध्ये होती. तो दक्षिण मुंबईतील एका मोठ्या बिझनेसमन कुटुंबातील होता. सर्वकाही ठीक होतं, पण जेव्हा मी फिल्म इंडस्ट्रीत काम करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मला समजलं की माझ्या पार्टनरला प्रसिद्धीच्या झोतात राहणारी महिला आवडत नाही. त्यामुळे मी प्रेमाऐवजी करिअरला निवडलं”, असं अमिषाने सांगितलं.

लग्नासाठी पूर्ण नकारात्मक नसल्याचंही तिने पुढे स्पष्ट केलं. ती पुढे म्हणाली, “मला योग्य व्यक्ती भेटल्यास मी नक्की लग्न करेन. जिथे इच्छा असते, तिथे मार्ग सापडतो.. असं म्हणतात. त्यामुळे जी व्यक्ती मला प्रत्येक अडथळ्यांमधून पार करत माझं मन जिंकेल, ती व्यक्ती माझा जोडीदार असेल. मला आजही संपन्न कुटुंबातून स्थळं येतात. माझ्यापेक्षा अर्ध्या वयाची लोकं मला डेटवर नेऊ इच्छितात. त्यासाठी मी तयार आहे.”

आजवर अमिषा पटेलचं नाव विविध कलाकारांसोबत जोडलं गेलं, परंतु 2000 दशकाच्या सुरुवातीला निर्माता विक्रम भट्टसोबतचं तिचं अफेअर सर्वाधिक चर्चेत राहिलं. पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांचं ब्रेक झालं.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी