राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले कॉमनवेल्थ गेम मधील गोल्ड मेडल लिस्ट दिलीप गावित आणि कोच वैद्यनाथ काळे भेट न घेताच परतले. साहेबांना आम्ही नंतर भेटू असं म्हणत दोघेही परतले. परत जाणाऱ्या गोल्ड मेडलिस्ट दिलीप गावित आणि कोच वैद्यनाथ काळे यांची मनसे पदाधिकाऱ्यांकडून मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला. दीड ते दोन तास बसवून ठेवल्यानंतरही भेट न दिल्याने नंतर भेटू असं सांगत दोघेही परतले.