मिरजमध्ये मोठी दुर्घटना, सिव्हिल हॉस्पिटलबाहेर स्लॅब कोसळला, 6 जण अडकले
मिरज सिव्हील हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराचं काम सुरू असताना एक दुर्घटना घडली. सिव्हिल हॉस्पिटलबाहेर स्लॅब कोसळून सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

मिरजमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मिरज सिव्हील हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराचं काम सुरू असताना एक दुर्घटना घडली. सिव्हिल हॉस्पिटलबाहेर स्लॅब कोसळून सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर बांधण्यात येणारी नवीन कमान अचनाक कोसळली. कमानीचा स्लॅब कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्दैवी अपघातामुळे अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला असून 7 ते 8 कामगार हे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांपैकी 5 ते 6 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजतयं. पोलीस, बचाव पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून जेसीबीने स्लॅबचा ढिगारा बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. घटनास्थळी मोठी गर्दी असून पोलिसांसह रुग्णालय प्रशासन ही दाखल झालं आहे.
शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर नवीन कमान उभारण्यात येत होती. त्या कमानीचं काम सुरू होतं. स्लॅब टाकत असताना अचानक तो कोसळून मोठी दुर्घटना घडली.
बातमी अपडेट होत आहे.
