Transport Vehicle : रेल्वेत वाहन कसे घेऊन जायचे, नेमकी काय प्रोसेस असते? वाचा संपूर्ण प्रक्रिया!
स्वतःची बाईक किंवा स्कूटर दुसऱ्या शहरात न्यायची असेल तर रेल्वेच्या लगेज आणि पार्सल सुविधेचा पर्याय उपलब्ध आहे. बुकिंगपासून कागदपत्रांपर्यंत संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.

कुठेही बाहेरगावी फिरायला गेलो कि वाहनांचे प्रचंड वांदे होतात. स्टेशनहबाहेर पडल्या पडल्या पहिले म्हणजे वाहनांचा शोध घ्यावा लागतो. जर वाहने घेऊन प्रवास करायचा म्हटला तर पेट्रोलचा खर्च, लांबचा प्रवास आणि वाहन सुरक्षित पोहोचण्याची सुरक्षित पोहोचण्याची चिंता त्यात वाहनाचे भरगच्च भाडे ही समस्याच वेगळी. मग काही जण महागड्या ट्रान्सपोर्ट कंपन्याचा पर्याय निवडतात. पण तुमचं वाहन ट्रेनमधूनही पाठवता येत हे तु्म्हाला माहित आहे का?
भारतीय रेल्वेकडे सायकल, स्कूटर, मोटारसायकल, अशा वाहनांसाठी सामान किंवा पार्सल म्हणून बुकींग करण्याची सुविधा आहे, विशेष म्हणजे तु्म्ही स्वत: त्याच ट्रेनने प्रवास करत असाल तर वाहन ‘लगेज’म्हणून नेता येतं आणि तुम्ही प्रवास करत नसाल तर ते पार्सल म्हणून पाठवता येत.
तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर
तुम्ही ज्या ट्रेनने प्रवास करत आहात त्याच ट्रेनने सायकल, स्कूटर किंवा बाईकही घेऊन जायची असेल तर ते वाहन सामान म्हणून बुक करता येते. वाहन ट्रेनच्या सामानाच्या डब्यात म्हणजेच ब्रेक व्हॅनमध्ये कार्यालयात पोहोचणे आवश्यक आहे. यावेळी प्रवाशाला आपले कन्फर्म ट्रेन तिकीट दाखवावे लागते आणि आवश्यक सामानाचा फॉर्म भरावा लागतो. लागू शुल्क भरल्यानंतर रेल्वेकडून सामानाची पावती दिली जाते आणि प्रवाशाच्या तिकिटावरही याची नोंद केली जाते. योग्य ठिकाणी पोहोचल्यानंतर आवश्यक पावती दाखवून वाहन ताब्यात घेता येतात.
ट्रेनने प्रवास करत नसाल तर
जर तुम्ही स्वत: ट्रेनने प्रवास करत नसाल आणि वाहन दुसऱ्या शहरात पाठवायाची असतील तर ती पार्सल म्हणून बुक करतात येतात. त्यांना पार्सल या कोट्यात बुक करता येते. यासाठी पार्सलचे बुकींग १ ते २ आठवडे आधी स्टेशन पार्सल ऑफिसमध्ये जाऊन बुक करायचे असते. तर डिलिव्हरीसाठी १ ते ७ दिवस लागतात.
बुकिंगसाठी कोणती कागदपत्रे लागतात?
बुकिंग करण्यासाठी वाहनाची मूळ कागदपत्रे, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, वैध विम्याचे कागद, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लाईसेन्स कागदपत्रे लागतात. पार्सल बुकिंगसाठी कन्फर्म तिकिट, आरसी नसल्याच वाहन खरेदी केल्याची पावती आवश्यक असते.
वाहन पाठवताना कोणती
वाहनावर स्पष्ट लेबल असणे आवश्यक आहे. याशिवाय लेबलवर वाहन मालकाचे नाव, मोबाईल नंबर, वाहन कुठून पाठवले जात आहे आणि कुठे पोहोचवायचे आहे, याची माहिती लिहिणे आवश्यक असते.
किती खर्च येतो
वाहनाचे वजन, प्रवासाचे अंतर आणि इतर निकषांच्या आधारे पैसे निश्चित केले जाते. सायकल पाठवण्यासाठी साधारण ३०० ते ८०० पर्यंत खर्च येतो किंवा बाईक आणि चारचाकी वाहने पाठवण्यासाठी ३००० ते ५००० पर्यंतचा खर्च येतो.
