AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाय ठेवताच दलदलीत गायब व्हाल… या गावातील लोक जमिनीवर पायच ठेवत नाही, असं कसं घडलं?

पृथ्वीवर अशी एक जागा आहे जिथे निसर्गानेच मानवासाठी 'नो एंट्री' लावली. या जागेमध्ये खोल दलदल, चिखल आणि धोकादायक प्राणी यांचा समावेश आहे. विशाल ग्रीन ॲनाकोंडा, ब्लॅक कैमन यांसारखे शिकारी, तसेच अथांग दलदल मानवी जीवाला धोका निर्माण करतात. इथे प्रत्येक क्षण सावधगिरीचा असतो, कारण एकदा अडकल्यावर बाहेर पडणे अशक्य होते. कुठे आहे ही जागा ?

पाय ठेवताच दलदलीत गायब व्हाल... या गावातील लोक जमिनीवर पायच ठेवत नाही, असं कसं घडलं?
Image Credit source: Lena Trindade/LightRocket via Getty Image
| Updated on: Sep 21, 2026 | 3:47 PM
Share

जगात काही जागा अशा असतात, जिथे निसर्गानेच मानवासाठी ‘नो एंट्री’ चा बोर्ड लावलेला असतो. तिथे जाण्याची मानवाल परवानगीच नाही. दक्षिण अमेरिकेतील अमेझॉनचं खोरं हे त्यापैकीच एक. या भागातील दलदल आणि चिखल इतका खोल आहे की तो अक्षरश: अथांग वाटतो. एखादी व्यक्ती किंवा माणूस इथे आला आणि अडकला तर स्वत:च्या प्रयत्नांनी इथून बाहेर पडण अशक्यच. याहूनही धोकादायक गोष्ट म्हणजे या भागात आढळणारे विशाल ग्रीन ॲनाकोंडा, ब्लॅक कैमनसारखे शिकारी आणि विविध विषारी जीव. त्यामुळे अमेझॉनच्या या दुर्गम दलदलीत प्रत्येक क्षण सावधगिरीचा असतो. एका बाजूला अमेझॉनची हिरवाई, निसर्गसौंदर्य आणि जैवविविधता मन मोहून टाकते; तर दुसऱ्या बाजूला पावलोपावली जीवाला धोका असतो. येथील दलदलीच्या जमिनीत एकदा पाय खोलवर रुतला, तर त्यातून बाहेर पडणे अत्यंत कठीण होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक पाऊल जपूनच टाकावं लागतं.

दलदल आणि खोल पाण्याचा धोका

‘डिस्कवर वाइल्डलाइफ’ या वाइल्डलाइफ मॅगझीनच्या रिपोर्टनुसार, अमेझॉनच्या दलदलीच्या प्रदेशात माणसांसाठी सर्वात मोठा धोका हा प्राण्यांचा नव्हे तर तिथल खोल पाणी आणि अथांग पसरलेला चिखल सर्वात धोकादायक ठरतो. जक या चिखलात एखादी व्यक्ती खोलवर रुतली, तर तळ नेमका कुठे याचा जराही अंदाज लागत नाही. रिपोर्टनुसार, दरवर्षी सुमारे 10 लाख पर्यटक अमेझॉनला भेट देतात. मात्र, या परिसरात फिरताना दलदल आणि खोल पाण्यापासून सावध राहणं अत्यंत महत्त्वाचे असतं.

दलदलीतील धोकादायक शिकारी

या दलदलीच्या परिसरात आढळणाऱ्या प्राण्यांमध्ये ब्लॅक कॅमन हा एक प्रमुख शिकारी आहे. मगरीच्या या प्रजातीची लांबी सुमारे 6 मीटर (20 फूट) पर्यंत आणि वजन तब्बल 300 किलोपर्यंत पोहोचू शकते. सध्या उपलब्ध नोंदीनुसार, 2000 ते 2016 या काळात अमेझॉन खोऱ्यात ब्लॅक कॅमनच्या हल्ल्यांमुळे 23 जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मच्छिमारांटा आणि नदी-नाल्यांमध्ये आंघोळ किंवा पोहण्यासाठी जाणाऱ्या स्थानिक नागरिकांचा समावेश होता.

ग्रीन ॲनाकोंडाही आढळतो

अमेझॉनच्या दलदलीचा आणखी एक भयावह प्राणी म्हणजे म्हणजे ग्रीन ॲनाकोंडा. हा जगातील सर्वात वजनदार साप मानला जातो. ‘वर्ल्ड ॲटलस’च्या नोंदीनुसार, त्याची पुष्टी झालेली लांबी सुमारे 5.2 मीटर (17 फूट) आणि वजन 227 किलोग्रॅमपर्यंत आढळले आहे. यापेक्षा मोठ्या अॅनाकोंडांच्या अनेक कथा आणि अपुष्ट दावेही वर्षानुवर्षे समोर येत असतात.

हा साप विषारी नसला तरी भयानक खतरनार आहे कारण तो त्याच्या ताकदीने शिकारीला घट्ट आवळून धरतो. ॲनाकोंडाने माणसांवर हल्ला केल्याच्या घटना खूपच दुर्मिळ आहेत, तरीही त्याचा प्रचंड आकार आणि ताकद यामुळे अमेझॉनची दलदल आणखी गूढ आणि भीतीदायक होते. म्हणूनच, कधी अमेझॉनच्या या दलदलीच्या भागात गेलात, तर प्रत्येक पाऊल अत्यंत काळजीपूर्वक टाका. टाकावे लागते. कारण ही जागा माणसांसाठी नाहीच, हे निसर्गानेच ठरवून दिलं आहे.

Follow Us
प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
Video : प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन
Devendra Fadnavis : TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन, दुष्काळाचं सावट दूर करण्यासाठी गणरायाला घातलं साकडं
महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? भरणेंनी काय दिलं आश्वासन
Maharashtra Drought | महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? मंत्री बाबासाहेब पाटलांची मोठी माहिती; पण दत्तात्रय भरणेंनी काय दिलं आश्वासन
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण