AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर, तुम्ही तेवढं… ओवैसींनी चक्क नितीन गडकरींचे मानले आभार; संकेत काय?

असदुद्दीन ओवैसींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आभार मानले आहेत, कारण गडकरींनी त्यांच्या आमदारांची कामे ऐकली. मात्र, यानंतर ओवैसींनी उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका मागील निवडणुकांपेक्षा वेगळ्या आणि आव्हानात्मक असतील. भाजपची आश्वासने पूर्ण न झाल्याने ही निवडणूक कुणासाठीही सोपी राहणार नाही.

सर, तुम्ही तेवढं... ओवैसींनी चक्क नितीन गडकरींचे मानले आभार; संकेत काय?
asaduddin owaisiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 21, 2026 | 11:40 AM
Share

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. आपल्या पाच आमदारांचं गडकरींनी कसं म्हणणं ऐकलं आणि त्यांना वेळ दिला, याचा किस्सा सांगत ओवैसी यांनी गडकरी यांचे आभार मानले. तसेच उत्तर प्रदेशातील राजकारणावरून त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली. दरम्यान, ओवैसी यांनी गडकरी यांचे आभार मानल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

असदुद्दीन ओवैसी हे रविवारी कानपूरमध्ये होते. यावेळी त्यांनी जाहीरपणे गडकरींचे आभार मानले. बिहारमध्ये आमचे पाच आमदार निवडून आले आहेत. जिंकल्यानंतर या आमदारांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली. मी गडकरींचे आभार मानतो. त्यांनी 45 मिनिट बसून आमच्या पाचही आमदारांचं म्हणणं ऐकलं. जुने पूल, अंडरपास पूल आदींबाबतची त्यांनी माहिती घेतली. त्यावेळी मी गडकरींना म्हटलं, सर तुम्ही फोन करून काम सुरू करायला सांगा. त्यावर गडकरींनी लगेच फोन लावला आणि पुलांची कामे लवकरात लवकर करा. मजलिसवाले माझ्या घरी येऊन बसले आहेत, असं अधिकाऱ्यांना सांगितलं, अशी माहिती ओवैसी यांनी दिली.

पुढची निवडणूक वेगळी होणार

यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीवरही भाष्य केलं. विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुका 2014, 2017, 2019 आणि 2022 सारख्या होणार नाहीत. या निवडणुका अत्यंत वेगळ्या होणार आहेत. ही निवडणूक वेगळी तर असेलच पण आव्हानात्मक असणार आहे. कारण भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. समाजवादी पार्टी सत्तेत होती, त्यावेळी Y (यादव) च्या गोष्टी केल्या जात होत्या. आता या ठिकाणी ‘T’ (ठाकूर)चं वर्चस्व आहे. या शिवाय इथली शासन व्यवस्था बरोबर नाही. राज्यात कायद्याचं सर्रास उल्लंघन होत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

गरीबांच्या जमिनी बळकावल्या

भाजपच्या सत्ता काळात गरीबांच्या जमिनी हडपल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यात विकासाचा मुद्दा आहे. विजेचा मुद्दा आहे. पण सरकारला काही फरक पडत नाहीये. पूर्वी समाजवादी पार्टीच्या सरकारमध्ये वेगळ्या पद्धतीने गुंडगिरी होती. आताच्या योगी सरकारमध्ये वेगळ्या प्रकारची गुंडगिरी आहे. त्यामुळेच यावेळची उत्तर प्रदेशातील निवडणूक कुणासाठीही सोपी राहणार नाही, असं ते म्हणाले.

उत्तर प्रदेशात यावेळी वेगळ्या प्रकारची निवडणूक होणार आहे. राम मंदिरातील हेराफेरीचा एसआयटी रिपोर्ट का समोर आणला जात नाही? सरकार हा रिपोर्ट उघड का करत नाही? या लोकांना जामीन का मिळत आहे? त्यांना जामीन कसा मिळत आहे? हा सुद्धा या निवडणुकीतील चर्चेचा विषय राहणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष