AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gokul President Election 2026 : नाविद मुश्रीफ यांची गोकुळमध्ये पुन्हा एन्ट्री? हसन मुश्रीफ यांचं मुलाबद्दल मोठं विधान काय?

गोकुळ निवडणुकीत नाविद मुश्रीफ यांचा पराभव झाला तरी, सरकारी संचालक नेमणुकीत त्यांच्या संभाव्य एन्ट्रीची चर्चा होती. मात्र, हसन मुश्रीफ यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. नाविद गोकुळमध्ये संचालक होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, सतेज पाटलांना बहुमत मिळूनही चेअरमन निवडता येत नसल्याने निर्माण झालेल्या कोंडीवरही त्यांनी भाष्य केले.

Gokul President Election 2026 : नाविद मुश्रीफ यांची गोकुळमध्ये पुन्हा एन्ट्री? हसन मुश्रीफ यांचं मुलाबद्दल मोठं विधान काय?
navid mushrifImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 05, 2026 | 12:02 PM
Share

गोकूळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव आणि गोकूळचे मावळते चेअरमन नाविद मुश्रीफ यांचा पराभव झाला आहे. मात्र, या निवडणुकीत सतेज पाटील यांना बहुमत मिळालं नाही. त्यामुळे सरकारने गोकुळवर चार संचालक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या चार संचालकांमध्ये नाविद मुश्रीफ यांचा समावेश असण्याची चर्चा होत आहे. चार पैकी एक संचालक म्हणून नाविद गोकूळवर येणार असल्याचं सांगितलं जात आहे. नाविद मुश्रीफ बॅकडोअरने गोकूळवर येण्याची चर्चा रंगली असून या सर्व चर्चांना हसन मुश्रीफ यांनी पूर्णविराम दिला आहे. गोकूळवर माझा मुलगा जाणार नाही, असं मुश्रीफ यांनी मीडियाशी संवाद साधताना स्पष्ट केलं आहे.

हसन मुश्रीफ यांनी यावेळी सतेज पाटील यांच्यावर टीका केली. सतेज पाटील यांचं बहुमत आहे ना? मग त्यांनी कोरम पूर्ण करावा आणि निवडावा त्यांचा चेअरमन. आम्ही कुठे त्यांना आडवलं आहे? पण त्यांना ते शक्यच होणार नाही. कारण गोकूळचा बायलॉज आणि नियमानुसार कोरम पूर्ण झाल्यावरच चेअरमन निवडला जातो. कोरम नसेल तर चेअरमनही निवडता येत नाही आणि मिटिंगही घेता येत नाही, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

मुलाची एन्ट्री नाही

गोकूळमधील डेडलॉक दूर करण्यासाठी सरकारने चार संचालक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने हा कायदा आणला असला तरी माझा मुलगा किंवा इतर पक्षाचं कोणीही गोकूळमध्ये संचालक होणार नाही. माझ्या मुलाचा बॅकडोअरने प्रवेश होणार नाही. तिथे तज्ज्ञांचीच नियुक्ती होईल. कोणत्याही पक्षाशी संबंध नसलेल्या कार्यकर्त्याची गोकूळवर सरकार नेमणूक करेल असं मला वाटतं, असं हसम मुश्रीफ यांनी सांगितलं.

प्रशासक नेमू शकलो असतो

हा डेडलॉक आहे. एका बायलॉजमुळे झालेला डेडलॉक आहे हे विरोधक समजून घेत नाही. त्यांनी त्यांचा चेअरमन निवडावा किंवा कोर्टात जावं, आम्ही त्यांना अडवलं नाही. न्यायालय काय निर्णय घेईल तो घेईल. त्याचा आदर केला पाहिजे. आमची भूमिका आहे की डेडलॉक कधी संपणार? निवडून आलेल्या लोकांच्या हातात सत्ता कशी जाणार? त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. सरकार प्रशासक नेमू शकलं असतं. पण तसं केलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.

दोस्त दोस्त ना राहा

सोशल मीडियाचा वापर करून या निवडणुकीत विखारी प्रचार करण्यात आला. हा संघ एवढा मोठा नाही, पण सोशल मीडियातून तो प्रचंड मोठा असल्याचं दाखवलं जात आहे. काँग्रेस पक्षात असलेल्या धर्मनिरपेक्ष पक्षातील लोकांनी माझ्या मुलाच्या विरोधात जातीयवादी प्रचार केला. सोशल मीडियातून विष कालवलं. सभासदांमध्ये विष कालवलं. दोस्त दोस्त ना राहा असं म्हणावं लागेल, असं ते म्हणाले.

Follow Us
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर ...
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर महाराष्ट्रात राजकारण करण्याची लायकी नाही!'
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्ग
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रवासी तासन् तास अडकले
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील...
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील संतापले, विचारला थेट सवाल!
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा...
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा चौकशी
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक...
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक आंदोलन!
सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील-पडळकर एकाच मंचावर
Sangli Padalkar Vs Patil : सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील- गोपीचंद पडळकर एकाच मंचावर
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअप...
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअपसाठी ब्रीच कॅंडी रुग्णालयात
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले, हा विजय...
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राज
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राजू शेट्टींचा सरकारला इशारा
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव,
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव, धर्मध्वजा धारक उपाधीही बहाल!