AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Laxmikant Berde: लक्ष्याची लक्ष्मी होती… कोण होती लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिली पत्नी? तिच्या निधनानंतर प्रचंड खचले होते

Laxmikant Berde: मराठी चित्रपटसृष्टीमधील सुपरस्टार अभिनेते म्हणून लक्ष्मीकांत बेर्डे यांची दोन लग्न झाली होती. त्यांची पहिली पत्नी देखील अभिनेत्री होती. ती कोण होती? तुम्हाला माहिती आहे का?

Laxmikant Berde: लक्ष्याची लक्ष्मी होती... कोण होती लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिली पत्नी? तिच्या निधनानंतर प्रचंड खचले होते
laxmikant Berde First WifeImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 05, 2026 | 11:41 AM
Share

लक्ष्मीकांत बेर्डे यांचे नाव मराठी चित्रपटसृष्टीत हास्यरसाच्या बादशहा म्हणून घेतले जाते. मात्र त्यांच्या खासगी आयुष्यातील एक महत्त्वाचा अध्याय बहुतेक प्रेक्षकांना माहीत नाही. त्यांची पहिली पत्नी रुही बेर्डे ही स्वतः एक यशस्वी अभिनेत्री होती. तिच्या कारकिर्दीपासून ते लक्ष्मीकांत यांच्यासोबतच्या संसारापर्यंत आणि अखेरच्या दुःखद प्रसंगांपर्यंतची कहाणी खूपच भावुक आणि हृदयस्पर्शी आहे.

रुही बेर्डे यांचे मूळ नाव पद्मा होते. पडद्यावर मात्र त्या रुही म्हणून ओळखल्या जात. मुंबईत जन्मलेल्या रुहींनी अभिनयाची सुरुवात नाटकांतून केली. ‘डार्लिंग डार्लिंग’ या नाटकाने त्यांना खूप लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर १९७३ मध्ये ‘जावई विकत घेणे आहे’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी सिनेमात पदार्पण केले. दादा कोंडके यांच्या ‘पांडू हवालदार’मधील भूमिकेने त्यांच्या कारकिर्दीला मोठी चालना मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक यशस्वी चित्रपट दिले.

नाटकाच्या वेळी पाहिली भेट झाली

रुही आणि लक्ष्मीकांत यांची पहिली भेट ‘वेडी माणसं’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान झाली. नंतर ‘कश्यात काय लफड्यात पाय’ आणि ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या नाटकांमध्येही त्यांनी एकत्र काम केले. याच काळात दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले आणि १९८३ मध्ये त्यांनी विवाह केला. लग्नानंतर लक्ष्मीकांत यांच्या कारकिर्दीला अचानक उभारी आली. रुही यांनी मात्र लोकप्रिय अभिनेत्री असूनही आणि अनेक ऑफर येत असतानाही पतीच्या यशासाठी आपली कारकिर्द काही काळासाठी बाजूला ठेवून घरसंसारावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.

अचानक निधन झाले

दुर्दैवाने हा संसार फार काळ टिकला नाही. लग्नानंतर सुमारे पंधरा वर्षांनी, ५ एप्रिल १९९८ रोजी रुही बेर्डे यांचे अंधेरीत गाडीतून प्रवास करताना ब्रेन हेमरेजमुळे निधन झाले. त्यांच्या जाण्याने लक्ष्मीकांत बेर्डे पूर्णपणे खचून गेले. लेखिका वसुंधरा साबळे यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, “रुही खरोखर लक्ष्याची लक्ष्मी होती. तिच्या पायगुणानेच लक्ष्या प्रसिद्धीच्या आणि ऐश्वर्याच्या शिखरावर पोहोचला. तिच्या जाण्याने तो इतका खचला की नंतर त्याने कधीच पूर्ण उभारी धरली नाही. स्मशानभूमीत अग्नी देतानाही तिच्या अंगावरील एकही अलंकार काढू न देणारा लक्ष्मीकांत तिच्या पार्थिवासमोर निःशब्द उभा होता.”

Follow Us
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर ...
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर महाराष्ट्रात राजकारण करण्याची लायकी नाही!'
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्ग
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रवासी तासन् तास अडकले
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील...
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील संतापले, विचारला थेट सवाल!
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा...
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा चौकशी
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक...
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक आंदोलन!
सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील-पडळकर एकाच मंचावर
Sangli Padalkar Vs Patil : सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील- गोपीचंद पडळकर एकाच मंचावर
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअप...
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअपसाठी ब्रीच कॅंडी रुग्णालयात
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले, हा विजय...
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राज
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राजू शेट्टींचा सरकारला इशारा
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव,
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव, धर्मध्वजा धारक उपाधीही बहाल!