AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार; मोदींच्या कॅबिनेटमध्ये कोणाला संधी मिळणार? बड्या नेत्याने सगळं सांगितलं

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. मोदींच्या कॅबिनेटमध्ये कोणाला संधी मिळणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे .

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार; मोदींच्या कॅबिनेटमध्ये कोणाला संधी मिळणार? बड्या नेत्याने सगळं सांगितलं
MODI CABINETImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 05, 2026 | 12:13 PM
Share

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेत दिले आहेत. संसदेतील हिवाळी अधिवेशनाच्या आधी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता व्यक्त केली आहे. तर शरद पवार यांनी एनडीएमध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याचेही आठवलेंनी सांगितले. सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चेदरम्यान आठवलेंनी भाष्य केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं की, ‘कॅबिनेटचा विस्तार होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधी फेरबदलाची शक्यता आहे. परंतु आता आंदोलने सुरू असल्यामुळे फेरबदल हे कधी होणार, याविषयी कोणतीही माहिती नाही. परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. यात सर्व जातींच्या प्रमुख नेत्यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे.

आठवलेंनी पुढे सांगितलं की, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शरद पवार यांच्याशी बोलणं झालं. शरद पवार यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना आधी पुण्यात दाखल केले. डिस्चार्ज मिळाल्यानंतर तपासणीसाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल केले. आठवलेंनी सांगितलं की, पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांचे संबंध चांगले आहेत. राजकारण वेगळं आहे. वैयक्तिक पातळीवर दोन्ही नेते एकमेकांचा आदर करतात. ही बाब दोन्ही पक्षातील नेते देखील मान्य करतात. शरद पवारांचं मार्गदर्शन आम्हाला लाभत असतं. शरद पवारांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. यामुळे मोदींनी शरद पवारांना फोन करून विचारपूस केली. यात कोणतंही राजकारण नाही’. ‘शरद पवार हे एनडीएमध्ये सहभागी होण्यास तयार नाही. शरद पवार साहेब एनडीएमध्ये आल्यास त्यांचे स्वागत केले जाईल. परंतु एनडीएमध्ये न जाण्याची शरद पवारांची भूमिका आहे. राज्यात महायुतीतही प्रवेश करण्याची त्यांची इच्छा नाही’.

शरद पवार यांचे जवळचे मित्र मानले जाणारे विठ्टल सेठ मनियार यांनी ही गुरुवारी महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, पीएम मोदी यांनी शरद पवार यांच्याशी बोलताना सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख केल्याचा दावा आहे.  मनियार यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली. दोघांनी एकमेकांशी आदरातिथ्याने संवाद साधला’, त्यानंतर त्यांनी सांगितले की, शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा दिसत आहे. सुप्रिया आणि आम्ही मिळून सांभाळू. तुम्ही आराम करावा, असे मोदींनी त्यांना सांगितले.

Follow Us
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर ...
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर महाराष्ट्रात राजकारण करण्याची लायकी नाही!'
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्ग
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रवासी तासन् तास अडकले
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील...
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील संतापले, विचारला थेट सवाल!
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा...
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा चौकशी
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक...
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक आंदोलन!
सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील-पडळकर एकाच मंचावर
Sangli Padalkar Vs Patil : सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील- गोपीचंद पडळकर एकाच मंचावर
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअप...
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअपसाठी ब्रीच कॅंडी रुग्णालयात
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले, हा विजय...
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राज
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राजू शेट्टींचा सरकारला इशारा
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव,
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव, धर्मध्वजा धारक उपाधीही बहाल!