इराण इतिहासजमा होणार? होर्मुझजवळ अमेरिकेने घेरलं, 1200 किलोमीटर लांबीच्या पाईपलाईनवर भीषण हल्ला
पश्चिम आशियात पुन्हा हल्ले सुरु झाले आहेत. एकमेकांवरील हल्ल्याचा भडका आणखी वाढला आहे. यामुळे पश्चिम आशियात राहणाऱ्या लोकांची चिंता वाढली आहे.

पश्चिम आशियात वातावरण चिघळत चाललं आहे. अमिरेका आणि इस्त्रायल पुन्हा एकदा इराणवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही देशात शांतता करार होणार असल्याच्या चर्चेदरम्यान पुन्हा भीषण हल्ले सुरू झाले आहे. दोन्ही देशांनी पुन्हा हल्ले सुरू केल्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल आणि नैसर्गिक वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचदरम्यान हूती बंडखोरांनी हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यामुळे संबंधित परिसरात पुन्हा युद्धाचा भडका उडाल्याची माहिती हाती आली आहे.
होर्मुझची सामुद्रधुनीमधील वाहतूक ठप्प पडली आहे. त्यामुळे आता जगभरातील देशांनी त्यांचा मोर्चा लाल समुद्राला अदनच्या आखाताशी जोडणाऱ्या ‘बाब अल-मंदिब’ सामुद्रधुनीकडे मोर्चा वळवलाय. त्या मार्गावरही आता हूती बंडखोरांनी भीषण हल्ले सुरू केले आहेत. या बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या 1200 किलोमीटर लांबीच्या ईस्ट-वेस्ट पाइपलाइनवर हल्ला करून तिचे मोठे नुकसान केलं आहे. या हल्ल्यामुळे सौदीला पाईपलाईन तातडीने बंद करावी लागली. बंडखोरांनी हल्ला केलेल्या पाइलपलाईनद्वारे जगात 5 टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा केला जातो. हूती बंडखोरांनी सौदीमधील रियाथच्या ‘किंग खालिद’ विमानतळावर देखील हल्ला केला. यानंतर आता अमेरिकेचा तिळपापड झाला आहे. दुसरीकडे इराणने युद्ध संपवण्यासाठी त्यांच्यासमोर 7 अटी ठेवल्या आहेत. त्यानंतरही अमेरिकेने इराणवर अंतिम प्रहार करण्याची तयारी पूर्ण केल्याचे दिसत आहे.
ब्रिटिश एअरबेसवरून अमेरिकन बॉम्बर जेट्सने उड्डाण केल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे आखातावर अमेरिकन हवाई दलाचे 7 एरिअल रिफ्यूलिंग टँकर्स आणि नौदलाचे ट्रायटन हेरगिरी करणारे ड्रोन घिरट्या घालत असल्याची माहिती आहे. इराण च्या सरकारी मीडियाने देखील ‘बंदर अब्बास’ शहरावर अज्ञात विमानांनी रेकी सुरू केली आहे. आता पुन्हा हल्ला झाल्यास पश्चिम आशियातील सर्व अमेरिकन लष्करी तळांना नष्ट केले जाईल, अशी इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम आशियात परिस्थिती अधिक बिघडत चालली आहे. यमनची राजधानी सना येथेही भीषण स्फोट झाले आहेत. सौदी अरेबियाकडून हूतींवर कारवाई करण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे. इराकमधील इरबिल विमानतळाजवळ भीषण स्फोटाचा आवाज ऐक आलाय. या विमानतळाजळ अमेरिकन लष्कराचा मोठा तळ असल्याची माहिती आहे. आता या हल्लामागे नेमकं कोण आहे, याची माहिती समोर आलेली नाही. परंतु पश्चिम आशिया महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्याची चर्चा जगभर सुरू झाली आहे.
