इंडस्ट्रीमधील पहिली अभिनेत्री, जिच्या नावावर बनलं गाणं, 17 वर्षांपूर्वी प्रचंड सुपरहिट, मुलींचं तर प्रचंड आवडतं
बॉलिवूड इंडस्ट्रीमधील एकमेव अभिनेत्री जिच्या नावावर बनलं गाणं. 17 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, प्रत्येक पार्टीत वाजतं. बिनधास्त असणाऱ्या मुलींचं तर सर्वात आवडतं गाणं.

बॉलिवूडमध्ये आपल्या हटके एक्सप्रेशन आणि अभिनयाच्या शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींचा उल्लेख झाला, की श्रीदेवी आणि करीना कपूरची नावं आवर्जून घेतली जातात. श्रीदेवीने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना कधी हसवलं तर कधी भावुक केलं. त्याचप्रमाणे करीना कपूरने देखील आपल्या वेगवेगळ्या भूमिका आणि हटके अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिच्या याच खास अंदाजामुळे तिला ‘एक्सप्रेशन क्वीन’ म्हटलं जातं.
करीना कपूरचं ‘बेबो’ हे टोपणनावही प्रचंड लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे, करीना कपूरच्या टोपणनावावर चक्क एक गाणं तयार करण्यात आलं आहे. हे गाणं तिच्या चाहत्यांमध्ये आजही चर्चेत असतं.
करीना कपूरच्या नावावर बनलेलं गाणं
2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कमबख्त इश्क’ या चित्रपटात अक्षय कुमार आणि करीना कपूरने प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटातील ‘बेबो मैं बेबो’ हे गाणं करीना कपूरवर केंद्रित होतं.
करीनाच्या हटके अदांना आणि नखऱ्यांना साजेसं असलेलं हे गाणं पेपी डान्स नंबर म्हणून लोकप्रिय झालं. या गाण्याचे बोल अन्विता दत्त गुप्तन यांनी लिहिले होते. अनु मलिक, सलीम-सुलेमान आणि आरडीबी यांनी गाण्याला संगीत दिलं होतं. प्रसिद्ध गायिका अलीशा चिनॉय यांच्या आवाजाने गाण्याला वेगळीच रंगत आली.
करीना कपूरची ही गाणीही गाजली
करीना कपूरच्या कारकिर्दीत अनेक लोकप्रिय गाणी आहेत. ‘छम्मक छल्लो’, ‘फेविकोल से’, ‘हलकट जवानी’, ‘बोले चूडियां’, ‘यू आर माय सोनिया’, ‘तारीफां’ आणि ‘नगाडा नगाडा बजा’ यांसारख्या गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
‘कभी खुशी कभी गम’मधील पू आणि ‘जब वी मेट’मधील गीत या व्यक्तिरेखांमधून करीनाने आपल्या अभिनयाची आणि एक्सप्रेशनची वेगळी शैली दाखवून दिली.
गेल्या काही काळात त्या ‘गीत’सारख्या व्यक्तिरेखेत फारशा दिसल्या नसल्या, तरी सार्वजनिक कार्यक्रमांमधील तिचा बोलण्याचा अंदाज, हावभाव आणि आत्मविश्वास आजही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. करीना कपूरचं ‘बेबो’ हे टोपणनाव आणि त्यावर आधारित गाणं तिच्या लोकप्रियतेचा एक खास भाग बनलं आहे.
