AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story : चालणे तर सोडाच, बसणेही कठीण… 90 टक्के दिव्यांग तरी थेट IIT मध्ये एन्ट्री; 17 वर्षीय संतोषचा संघर्ष वाचून सलाम ठोकाल!

Santosh IIT Madras : जन्मापासून 90 टक्के स्पायनल मस्क्युलर डिसॅबिलिटी (दिव्यांग) असतानाही चेन्नईतील 17 वर्षीय संतोषने IIT मद्रासमध्ये प्रवेश मिळवला आहे. त्याची कहाणी जाणून घेऊयात.

Success Story : चालणे तर सोडाच, बसणेही कठीण... 90 टक्के दिव्यांग तरी थेट IIT मध्ये एन्ट्री; 17 वर्षीय संतोषचा संघर्ष वाचून सलाम ठोकाल!
Santosh IIT Madras inspiring storyImage Credit source: Google
| Updated on: Sep 06, 2026 | 9:21 PM
Share

परिस्थिती कितीही वाईट असली तरी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर ती पूर्ण केली जाऊ शकतात. चेन्नईतील 17 वर्षीय संतोषची कहाणीही अशीच प्रेरणादायी आहे. जन्मापासून सेरेब्रल पाल्सी आणि 90 टक्के स्पायनल मस्क्युलर डिसॅबिलिटी (दिव्यांग) असतानाही संतोषने शिक्षण आणि आपली स्वप्नं कधीच सोडली नाहीत. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. संतोषचे वडील ऑटो चालवून कुटुंबाचा खर्च भागवत होते आणि मुलाचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मेहनत करत होते. परिस्थितीसमोर हार न मानता संतोषने IIT मद्रासमध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहिले. आता त्याने हे स्वप्न पूर्ण केले आहे. IIT मद्रासने स्वतः संतोषची ही प्रेरणादायी कहाणी शेअर केली असून, त्यातून अनेकांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळत आहे. ही कहाणी सविस्तर जाणून घेऊयात.

मित्रांनी दिली IITची माहिती

IIT मद्रासच्या अधिकृत X अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय जे. संतोषसाठी IIT मद्रास हे एकेकाळी केवळ ऐकलेले नाव होते. गेल्या वर्षी त्याच्या शाळेने IIT मद्रासला भेट दिली होती. मात्र, संतोषला या भेटीत सहभागी होता आले नाही. त्यानंतर त्याच्या मित्रांनी IIT मद्रासच्या भेटीचे अनुभव त्याला सांगितले. त्यांचे अनुभव ऐकल्यानंतर भारतातील या प्रतिष्ठित संस्थेत शिक्षण घेणे कसे असेल, असा विचार संतोषच्या मनात आला. तेव्हापासून त्याने IIT मद्रासमध्ये शिकण्याचे स्वप्न पाहिले आणि आता त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे.

IIT मद्रासच्या BS प्रोग्राममध्ये प्रवेश

संतोषने IIT मद्रासच्या डेटा सायन्स आणि अॅप्लिकेशन्समधील चार वर्षांच्या BS प्रोग्राममध्ये प्रवेश मिळवला आहे. दुसऱ्या प्रयत्नात त्याने या अभ्यासक्रमाची क्वालिफायर परीक्षा उत्तीर्ण केली. ज्या संस्थेत जाण्याची संधी तो यापूर्वी गमावून बसला होता, त्याच IIT मद्रासमध्ये आता त्याच्या नव्या शैक्षणिक प्रवासाला सुरुवात होणार आहे. IIT मद्रासमध्ये निवड झाल्याची माहिती मिळाल्यानंतर संतोषला मोठा आनंद झाला.

जन्मापासून 90 टक्के अपंगत्व, चालणेही कठीण

संतोषला जन्मापासूनच सेरेब्रल पाल्सी असून, त्याला 90 टक्के स्पायनल मस्क्युलर डिसॅबिलिटी आहे. त्यामुळे त्याला चालणे, उठणे आणि बसणे यामध्येही अडचणी येतात. अशा परिस्थितीत त्याचा शिक्षणाचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. मात्र, या अडचणींमुळे संतोषची जिद्द कधीच कमी झाली नाही. IIT मद्रासमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर त्याने आपला आनंद व्यक्त करताना, हा क्षण आपल्यासाठी अत्यंत खास असल्याचे सांगितले.

वडील ऑटो चालवतात

संतोषचे वडील ऑटो-रिक्षा चालवतात. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मर्यादित असतानाही त्यांनी मुलाच्या शिक्षणाला नेहमीच प्राधान्य दिले. संतोषने सुमारे दोन आठवड्यांपूर्वी दुसऱ्या प्रयत्नात IIT मद्रासची क्वालिफायर परीक्षा उत्तीर्ण केली. आता सप्टेंबर 2026च्या तिसऱ्या आठवड्यापासून संतोष IIT मद्रासच्या चार वर्षांच्या BS प्रोग्रामचे शिक्षण सुरू करणार आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा फायदा

हा अभ्यासक्रम संतोषसाठी विशेष महत्त्वाचा आहे, कारण त्याचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करता येते. संतोषला असा पदवी अभ्यासक्रम हवा होता, जो तो घरातून शिकत पूर्ण करू शकेल. दररोज कॉलेजमध्ये जाऊन पारंपरिक इंजिनीअरिंग अभ्यासक्रम करणे त्याच्यासाठी शारीरिकदृष्ट्या मोठे आव्हान ठरले असते. त्याचबरोबर काही अभ्यासक्रमांची फीही त्याच्या कुटुंबाच्या बजेटच्या बाहेर होती.

गेल्या वर्षी त्याच्या शाळेत NGO TN ची टीम आली होती. त्यावेळी संतोषला IIT मद्रासच्या या अभ्यासक्रमाबद्दल माहिती मिळाली. त्याने हा अभ्यासक्रम आपल्या परिस्थितीसाठी योग्य पर्याय असल्याचे ओळखले आणि मेहनत सुरू ठेवली. आज त्याच्या जिद्दीमुळे IIT मद्रासमध्ये शिक्षण घेण्याचे त्याचे स्वप्न साकार झाले आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली