घटस्फोट हा शब्दच… अभिनेता गोविंदा सुनीता आहुजासोबतच्या घटस्फोटावर थेट बोलला..
बॉलिवूड अभिनेता गोविंदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. गोविंदाने पहिल्यांदाच त्याच्या आयुष्यावर भाष्य केले. पत्नी सुनीता हिच्याकडून होणाऱ्या आरोपांवर बोलताना गोविंदा दिसला. घटस्फोटाबद्दलही त्याने भाष्य केले.

बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. रूपा नावाचा त्याचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, पण त्याच्या या चित्रपटापूर्वीच काैटुंबिक कलहात अडकला. गोविंदाची पत्नी बोलताना त्याच्यावर अनेकदा विवाहबाह्य संबंधांचे आरोप करते. हेच नाही तर तिने घटस्फोटासाठी अर्जही केला होता. तो अर्ज तिने नंतर मागे घेतला. अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत गोविंदाचे नाव जोडले जात आहे. अनेकदा दोघे एकत्र स्पॉट होतानाही दिसतात. लालबाग राजाचे दर्शन घेण्यासाठी गोविंदा कोमल राणी हिच्यासोबत पोहोचला तर पत्नी सुनीता आहुजा एकटीच पोहोचली होती. यादरम्यान लोक गोविंदाला खडेबोल सुनावताना दिसले. पत्नीकडून सतत आरोप होत असतानाही त्यावर पहिल्यांदाच जाहीरपण आणि सर्वकाही सांगताना गोविंदा दिसला.
गोविंदाने म्हटले की, सुनीता जे काही करत आहे ते आपल्या मुलांसाठी करत आहे. सुनीता माझे पहिले प्रेम आहे. पण प्रेमासारख्या गोष्टींशी खेळणे योग्य नाही. यादरम्यान मोठा आरोप करत गोविंदाने म्हटले की, त्यांच्या संसारात एका तिसऱ्या व्यक्तीमुळए फूट पडली आहे. पण हा तिसरा व्यक्ती कोण? याचे नाव गोविंदाने घेतले नाही.
सुनीताच्या डोळ्यासमोर एक पडदा आहे. सुनीता आहुजाने कोर्टात घटस्फोटासाठी केलेल्या अर्जावर बोलताना गोविंदाने म्हटले की, तिने तो निर्णय घेतला. तिला तो निर्णय घ्यायचाच होता. घटस्फोटावर त्याने बोलताना म्हटले की, नाही… नाही.. आम्ही हिंदू आहोत… आमच्या परंपरेत घटस्फोट हा शब्दच अस्तित्वात नाही. व्यवस्थेत सर्व आवश्यक तरतूदी आधीच आहेत.
सुनीता आहुजासोबत गोविंदा घटस्फोट घेणार नाही, असेच त्याच्या बोलण्यावरून दिसत आहे. मी माझ्या मुलांसाठी सर्व करत असल्याचेही त्याने म्हटले. सुनीता आहुजा आणि गोविंदा यांच्या नात्यातील वाद पुढे आला असून सुनीता सातत्याने गोविंदावर आरोप करताना दिसले. मात्र, त्यावर जाहीरपणे बोलणे कायमच गोविंदाने टाळले. आता त्याने पहिल्यांदाच सर्व गोष्टींवर भाष्य केले.
