Maharashtra News Live : नांदेडनंतर परभणीत 32 वर्षीय शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय
Maharashtra News Live : नांदेडनंतर परभणीत 32 वर्षीय शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे. कर्जासाठी छळ केल्याने एका शेतकऱ्याने आयुष्य संपवलं. यावरून विरोधी पक्षातील नेतेही आक्रमक झाले आहेत .

LIVE NEWS & UPDATES
-
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळातही सावकारी परवान्याची मागणी
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळातही सावकारी परवान्याची मागणी करण्यात आली आहे. सावकारी परवान्यासाठी १२ नवीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. अवैध सावकारांकडून महिन्याला ५ ते १० टक्के किंवा त्याहून अधिक व्याज आकारणी केली जाते. विनापरवाना सावकारी आणि अवाजवी व्याज आकारणाऱ्यांवर कारवाईचा इशारा सहकार विभागाने दिला. सावकारांविरोधात न घाबरता तक्रार करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधकाने केलं.
-
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा – सतेज पाटील
काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य केलं. ‘शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले नसेल,तर त्याचा फायदा काय…आमचे म्हणणं आहे की, सरसकट कर्जमाफी करा, असे काँग्रेस नेते सतेज पाटील म्हणाले.
-
-
जालन्यात दुष्काळाची दाहकता वाढली
जालना जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता अधिकच वाढली आहे. पाण्याअभावी दीड एकर क्षेत्रावरील मोसंबीची बाग जमीन दोस्त केली. जवळपास 350 मोसंबीच्या झाडावर jcb फिरवला. बदनापूर तालुक्यातल्या पाडळी गावातील विदारक चित्र पाहायला मिळत आहे. छोटे-मोठे जलस्रोत आटल्याने जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी अधिकच चिंतेत आहेत.
-
पुढील चार दिवसांत कोकणात पावसाचा इशारा
रत्नागिरी- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे हवामान विभागने २७ ते २९ ऑक्टोबरपर्यंत कोकणात पावसाचा इशारा दिलाय. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा आणि त्यामुळे हवामान प्रणाली सक्रिय झाली आहे. कोकणात सध्या संमिश्र आणि बदलत्या हवामानाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात नवीन हवामान प्रणाली तयार होत असल्याने त्याचा परिणाम दिसणार आहे. पुढील काही दिवस सायंकाळी विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे.
-
नाशिक-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी
नाशिक मुंबई महामार्गावर जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी झाली आहे. अवजड वाहन बंद पडल्याने झाली वाहतूक कोंडी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल अवजड वाहन बाजूला करून वाहतूक कोंडी सोडविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
-
-
रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका
धाराशिव जिल्ह्यात भीषण दुष्काळाचा फटका आता रेशीम उद्योगालाही बसू लागलाय. पाण्याअभावी रेशीम उद्योगासाठी महत्त्वाचे असलेले तुतीचे प्लॉट वाळून चालले आहेत. जिल्ह्यातील हजारो शेतकरी रेशीम उद्योगाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने तुतीची झाडे जगवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. तुतीची पानेच उपलब्ध झाली नाहीत, तर रेशीम अळ्यांचे संगोपन आणि उत्पादनावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे आधीच दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा रेशीम उद्योग आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
मायक्रो फायनान्सच्या कर्जाची परतफेड कशी करायची, या विवंचनेतून परभणीतील केकरजवळा येथील 32 वर्षीय शेतकऱ्याने जीवन संपवलं आहे. लहू माणिक लाडाने असं जीवन संपवणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. मागील दोन महिन्यापासून लहू लाडाने हे शेती उध्वस्त झाल्याने मानसिक तणावात होते. त्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल आहे. याप्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील दुष्काळामुळे परिस्थिती अवघड झाली आहे. यावरून विरोधी पक्षाचे नेते आक्रमक झाले आहे. राज ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे जाहीर केले आहे. दुष्काळासहित राज्य, देशातील घडामोडी जाणून घ्या
Published On - Oct 25,2026 9:02 AM
