AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8-10 हजारांच्या कर्जासाठी छळ, शेतकर्‍याचा टोकाचा निर्णय, नांदेडमधील घटनेनंतर रोहित पवारांचा सरकारला मोठा इशारा, म्हणाले…

नांदेडमध्ये 8-10 हजारांच्या कर्जासाठी छळ केल्याने शेतकर्‍याने टोकाचा निर्णय घेतला. नांदेडमधील या घटनेनंतर रोहित पवारांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे.

8-10 हजारांच्या कर्जासाठी छळ, शेतकर्‍याचा टोकाचा निर्णय, नांदेडमधील घटनेनंतर रोहित पवारांचा सरकारला मोठा इशारा, म्हणाले...
rohit pawar (Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 25, 2026 | 9:15 AM
Share

नांदेडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नांदेडच्या मायक्रो फायनान्स खासगी कंपनीने 10000 रुपयांच्या कर्जासाठी शेतकऱ्यांचा छळ केला. त्यानंतर या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  या प्रकरणी कंपनीचे मालक आणि इतर दोघांच्या विरोधात हत्या आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडमधील शेतकऱ्याच्या आत्महत्येवरून आमदार रोहित पवारांनी संताप व्यक्त केला आहे.

नांदेडच्या मुदखेज तालुक्यातील मालकौठा येथील रहिवासी चंद्रकांत शिंदे यांच्याकडे दोन एकर शेती होती. त्यांनी एका फायनान्स कंपनीकडून 10 हजारांचं कर्ज घेतल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. परंतु या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याला डांबून ठेवलं. त्यानंतर प्राणघातक मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी फायनान्स कंपनीच्या मालकासहित इतर कर्मचाऱ्याच्या विरोधात हत्येचा आरोप केला. या कंपनीने दहा हजारांच्या बदल्यात 70 हजारांची मागणी केल्याचाही त्यांनी आरोप केला. या घटनेनंतर शिंदे यांच्या कुटुंबीयांनी या घटनेची सखोल चौकशीची मागणी केली.

रोहित पवारांची पोस्ट जशीच्या तशी 

रोहित पवार म्हणाले, ‘मायक्रो फायनान्स कंपनीच्या ८-१० हजाराच्या कर्ज वसुलीसाठी नांदेडच्या माळकौठ्यात सदर कंपनीने शेतकऱ्याचा अनन्वीत छळ करून खून केल्याच्या घटनेपाठोपाठ आता परभणीतही मानवत तालुक्यात मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्जाला कंटाळून अवघ्या ३२ वर्षीय लहू लाडाने या शेतकऱ्याने आत्महत्या केली. सरकारने यात लक्ष घातलं नाही तर अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होत राहतील, असं आम्ही वारंवार सरकारला सांगूनही सरकारला ऐकू येत नसेल तर हे सरकार झोपलंय का? मायक्रो फायनान्स कंपन्या या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कर्जवसुलीचं काम देतात आणि ते कर्ज वसुलीसाठी अक्षरशः लोकांची इज्जत घेतात, धमक्या देतात, छळ करतात. सरकारने याला वेळीच आळा घालावा, नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरवावं लागेल’. रोहित पवारांनी यावेळी ही पोस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनाही टॅग केली आहे. त्यामुळे आमदार रोहित पवारांच्या पोस्टवर सत्ताधारी मंत्री काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.

Follow Us
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...