AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसचे 75 तर मविआचे 160 आमदार निवडून येण्याचा IB रिपोर्ट; पण… 2024 च्या निवडणूकीविषयी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा मोठा दावा

Congress-MVA IB Report: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये काँग्रेसचे 75 तर मविआचे 160 आमदार निवडून येण्याचा IB रिपोर्ट असल्याचा मोठा दावा काँग्रेसच्या बड्या नेत्याने केला आहे. या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.

काँग्रेसचे 75 तर मविआचे 160 आमदार निवडून येण्याचा IB रिपोर्ट; पण... 2024 च्या निवडणूकीविषयी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा मोठा दावा
काँग्रेसचे 75 तर मविआचे 160 आमदार निवडून येण्याचा IB रिपोर्ट
| Updated on: Oct 25, 2026 | 8:02 AM
Share

Nana Patole Big Claim: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये काँग्रेसचे 75 तर मविआचे 160 आमदार निवडून येण्याचा इंटेलिजन्स ब्युरोचा (IB Report) अहवाल होता. सरकारी यंत्रणांना हा अहवाल देण्यात आला. 2024 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार होतं, असा दावा काँग्रेस नेते आणि आमदार नाना पटोले यांनी केला आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी हा अहवाल हाती लागल्यानंतर पुढे काय झाले याविषयी धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या या नवीन वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

बोगस आकडेवारीतून रोखले सरकार

बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन सभेत नाना पटोले यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले. बोगस मतदानाच्या माध्यमातून हे सरकार आल्याचा दावा त्यांनी केला. मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेनंतर वाढलेल्या मतदानाच्या बोगस आकडेवारीमुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार रोखण्यात आले. हा एक कट होता, असे नाना पटोले म्हणाले. तर येत्या काळात महागाईचा मोठा भडका उडणार असल्याचा दावा त्यांनी केला. पेट्रोल 400 रुपयांचा टप्पा ओलंडणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

मत चोरीच्या आंदोलनावरचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच जरांगे पाटलांची ऑडिओ क्लिप बाहेर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नाना पटोले यांनी जरांगेंनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपवरून भाजप आणि राज्यातल्या फडणवीस सरकारवर मोठा आरोप केलाय. देशातील मतचोरीवरच्या आंदोलनावरचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच भाजप आणि फडणवीस सरकारने ही ऑडिओ क्लिप समोर आणण्याचा आरोप त्यांनी केलाय. ते अकोला येथे बोलत होतेय. दरम्यान, ऑडिओ क्लिप संजय राऊत यांच्या ‘वॉर रूम’मध्ये बनल्याच्या भाजपच्या आरोपावरही त्यांनी जोरदार पलटवार केलाय. राज्यात भाजपचे सरकार असल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी आणि सर्व सत्य समोर आणावं असं ते म्हणालेत. मत चोरीच्या मुद्द्याला लोकांच्या मिळत असलेल्या प्रतिसादावरून भांबवलेलं सरकार आता त्यावरून लक्ष हटविण्यासाठी ऑडिओ क्लिपसारख्या गोष्टी समोर आणत असल्याचं नाना पटोले म्हणाले.

पाच माजी मुख्यमंत्र्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी?

काँग्रेस सोडून भाजपवासी झालेले पाच माजी मुख्यमंत्री पुन्हा परतीच्या मार्गावर असल्याची चर्चा होत आहे. त्यावरही नाना पटोले यांनी मोठे भाष्य केले. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविषयी सुद्धा असाच दावा करण्यात येत आहे. त्यावर बोलताना नाना पटोले यांनी काँग्रेसच्या मूळ प्रवाहात येण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. या बड्या नेत्यांच्या घरवापसीबाबत हायकमांड निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.

Follow Us
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...